साबला शाळेच्या दोन शिक्षकांची बदली
By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:20:08+5:302014-06-30T00:36:06+5:30
केज : तालुक्यातील साबला येथील जि़ प़ प्रा़ शाळा तीन दिवसांपासून बंद होती़ या शाळेच्या दोन शिक्षकांची बदली करण्यावरुन गावकऱ्यांनी कुलूप ठोकले होते़

साबला शाळेच्या दोन शिक्षकांची बदली
केज : तालुक्यातील साबला येथील जि़ प़ प्रा़ शाळा तीन दिवसांपासून बंद होती़ या शाळेच्या दोन शिक्षकांची बदली करण्यावरुन गावकऱ्यांनी कुलूप ठोकले होते़ याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर दोन्ही शिक्षकांची बदली केली आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी शेख एच़ एस़ यांनी शाळेत जाऊन या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याचे ग्रामस्थांना सांगितले़ त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेला ठोकलेले कुलूप काढले़ यात मुख्याध्यापक सी़ जी़ चाटे व बी़ के़ बोराडे यांचा समावेश आहे. या शाळेत तीन शिक्षक आहेत़ श्रीमती बी़ एम़ साखरे या शाळेत आहेत़ सध्या त्या पहिली ते पाचवी वर्गाचे कामकाज पाहत आहेत. बदली करण्यात आलेले दोन्ही शिक्षक चांगले शिकवत नाहीत व शाळेत वेळेवर येत नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी सरपंच एम़ एस़ काकडे व राम नाईकवाडे यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी केज यांच्याकडे लेखी स्वरुपात केला होता़ त्यानंतर शिक्षकांची बदली झाल्याने शाळा उघडण्यात आली, असे काकडे यांनी सांगितले़
याबद्दल शिक्षणाधिकारी पी़ डी़ महानुभव म्हणाले, चाटे व बोराडे यांची बदली झाली आहे़ त्या ठिकाणी दोन नवीन शिक्षक पाठविण्यात येणार आहेत़ (वार्ताहर)