शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

‘एस. टी.’ ची शनिवारपासून ‘वर्षा सहल’

By admin | Updated: July 24, 2014 00:39 IST

औरंगाबाद : रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे शहराजवळील पर्यटनस्थळे हिरवळीने बहरली आहेत.

औरंगाबाद : रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे शहराजवळील पर्यटनस्थळे हिरवळीने बहरली आहेत. तसेच सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांत पर्यटन आणि देवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही यासाठी कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी २६ जुलैपासून शहराजवळील स्थळांसाठी वर्षा सहल बससेवा सुरू केली जात आहे.वर्षा सहल बससेवेअंतर्गत वेरूळ, खुलताबाद आणि म्हैसमाळ येथे जाण्याची सुविधा देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी १० वाजता ही बस वेरूळसाठी रवाना होईल. त्यानंतर खुलताबाद आणि म्हैसमाळसाठी बस रवाना होईल. प्रवाशांना वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचे तसेच खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे, तर म्हैसमाळ येथील बालाजी मंदिराचे दर्शन घेता येईल. तसेच जगप्रसिद्ध वेरूळची लेणी आणि म्हैसमाळ येथील व्ह्यू पॉइंटहून निसर्ग सौंदर्य न्याहाळता येईल. पावसाळी हंगाम हा महामंडळासाठी कमी गर्दीचा हंगाम असतो. या कालावधीत प्रवाशांची संख्या कमी होते. परंतु त्याच वेळी शहराजवळील या स्थळांना भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी असते. शहरात रोज मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. या पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी अनेक पर्यटक किफायतशीर अशा वाहनांचा प्राधान्याने विचार करतात. त्यामुळे एस. टी. महामंडळाकडून सुरूकरण्यात येणारी ही बससेवा महत्त्वाची ठरणार आहे. ‘वर्षा सहल’ साठी ४४ आसनी लाल बस सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षणाची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक (वरिष्ठ ) प्रताप जाधव यांनी दिली.प्रवासी वाढविण्यास मदतकमी गर्दीचा हंगाम असल्याने या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळातर्फे विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वर्षा सहल बससेवा प्रवासी वाढविण्याबरोबर उत्पन्नात वाढ होण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.अजिंठा पॅकेज टूर्सएस. टी. महामंडळातर्फे फेबु्रवारीमध्ये औरंगाबाद- अजिंठा अशी विशेष सहल बस (अजिंठा पॅकेज टूर्स) सुरू करण्यात आली होती. प्रवाशांकडून त्यास प्रारंभी प्रतिसाद मिळाला होता. या टूर्स पॅकेजला जवळपास ५५ टक्के प्रतिसाद मिळाला होता.प्रवाशांची सुविधाशनिवारपासून वेरूळ, खुलताबाद आणि म्हैसमाळसाठी वर्षा सहल बससेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे शहराजवळील या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची सुविधा होईल, असे विभाग नियंत्रक संजय सुपेकर म्हणाले.