शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऑरिकमधील रशियन स्टील कंपनीला तूर्तास ‘कोरोना प्रादुर्भावाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 2:53 PM

‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून व्यवस्थापकीय संचालकांनी शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.

ठळक मुद्दे४३ एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार या उद्योगाच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येतील

- विजय सरवदेऔरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना संसर्गाची स्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियन स्टील उद्योगाला सप्टेंबरपासून येथे प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल, असा सल्ला ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. 

‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून व्यवस्थापकीय संचालकांनी काल ऑरिक सिटीमध्ये जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, औरंगाबादेतील कोरोनाची सद्य:स्थिती कशी आहे, लॉकडाऊन उघडले का, बांधकामासाठी मजूर उपलब्ध होतील का, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य व केंद्र सरकारच्या काय मार्गदर्शक सूचना आहेत, याविषयी ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली. 

जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही त्यांना यासंबंधी तात्काळ उत्तर दिले आहे. औरंगाबादेत सध्या कोरोनाची स्थिती निवळत आहे. येथे आता अनलॉक सुरू झाले आहे. तरीही एवढा ऑगस्ट महिना थांबा.  सप्टेंबर महिन्यात जागेचा ताबा घेऊन लगेच कंपनीचा बांधकाम आराखडा तयार करता येईल व प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात करता येईल. मजुरांची अडचण येणार नाही, असे सांगून ‘एनएलएमके’च्या व्यवस्थापकीय संचालकांना कोरोनासंबंधीच्या केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनाही पाठवल्या आहेत. 

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीच्या बाजूला ४३ एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ही कंपनी या महिन्यातच जागेची रक्कम जमा करणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. जगभरातील ३०-४० देशांत, तसेच आपल्या देशातही ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. ही कंपनी येथे कार्यान्वित झाल्यास सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालणा मिळणार आहे.

या उद्योगाच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येतील‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) ही रशियन कंपनी दोन टप्प्यांमध्ये औरंगाबादेत ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिकच्या बाजूचा ४३ एकर भूखंड पसंत केला आहे. जागेची टोकन अमाऊंट भरलेली आहे. या महिन्यात ते जागेची संपूर्ण रक्कम जमा करतील. या उद्योगामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होतील, असे ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरrussiaरशिया