शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

डीएमआयसीत दोन महिन्यांत ट्रान्सफॉर्मर क्लस्टर; रशियन कंपनी एनएलएमके करणार गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:05 IST

रशियन कंपनी एनएलएमकेच्या कामाला दोन महिन्यांत सुरुवात

ठळक मुद्दे ‘एनएलएमके’ ही रशियातील सर्वांत मोठी व जगात २० व्या रँँकवर असलेली कंपनी आहे. पहिल्या टप्प्यात ८०० कोटींची गुंतवणूक 

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये बिडकीन येथे नोव्होलिपटेस्क स्टील या (एनएलएमके) रशियन कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर तयार करण्याची तयारी दर्शविली असून स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बनविणारा औरंगाबादेत होऊ घातलेला हा देशातील पहिलाच उद्योग असेल.

पहिल्या टप्प्यातील सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीमुळे ट्रान्सफॉर्मर तयार करणारे आणखी २० पूरक उद्योग येथे येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर क्लस्टर तयार केले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत प्रकल्प सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. मराठवाडा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आज गुरुवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी सकाळी आॅरिक सिटीच्या कार्यालयास तसेच ‘डीएमआयसी’च्या कामांची पाहणी केली. औरंगाबादचे पालकमंत्री झाल्यानंतर देसाई यांनी ‘डीएमआयसी’कडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. एनएलएमकेच्या प्रकल्पात  पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, औरंगाबादेतील ‘डीएमआयसी’मध्ये उद्योग उभारण्यासाठी अनेक उद्योजक इच्छुक आहेत. 

अनेक मोठ्या उद्योजकांनी या ठिकाणी येऊन जागेची पाहणीदेखील केली आहे. यापैकी रशियामध्ये पोलादापासून स्टील तयार करणाऱ्या ‘एनएलएमके’ या कंपनीने ‘डीएमआयसी’च्या बिडकीन पार्कमध्ये सुरुवातीला ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपनीला प्लॉटही देण्यात आला आहे. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर तयार करणार आहे. स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बनवणारा औरंगाबादेत होऊ घातलेला देशातील हा पहिलाच उद्योग असेल. या कंपनीमुळे थेट १४०० ते १५०० जणांना तर तब्बल अप्रत्यक्षपणे २ हजार रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय इतर राज्यातील ट्रान्सफॉर्मर तयार करणाऱ्या जवळपास २० कंपन्यांनीही या ठिकाणी येण्याची तयारी दशर्वली आहे. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर क्लस्टर उभारले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेता विकास जैन, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींची उपस्थिती होती.

जागतिक उत्पादनइलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी ‘एनएलएमके’ ही रशियातील सर्वांत मोठी व जगात २० व्या रँँकवर असलेली कंपनी आहे. ही कंपनी आता औरंगाबादेत पहिल्यांदाच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. आपल्या देशात अलीकडच्या काही दशकांत विजेची मागणी वेगाने वाढली आहे. परिणामी, विद्युत उपकेंद्रांची गरजही ३० पटीने वाढली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट दर्जाचे स्टील ही ‘एनएलएमके ’ कंपनी तयार करते.सध्या ही कंपनी आपल्या देशाला २० टक्के ट्रान्सफॉर्मर स्टीलचा पुरवठा करीत आहे. या कंपनीमुळे वीज क्षेत्राला जागतिक पातळीवरील उत्पादन मिळू शकते.

टॅग्स :DMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय