शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:02 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायकवाडी प्रशासनास मंगळवारी दिवसभर लोकांनी फोन करून याबाबत विचारणा केली. त्यामुळे धरण प्रशासनाने सायंकाळी अधिकृत प्रेसनोट काढून पाणी सोडले नसल्याचा खुलासा केला आहे.याबाबत धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारी प्रकल्पाचे एकही गेट उघडले नाही. ‘जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडले’ अशी बातमी सोशल मीडियावरून पसरविली जात आहे, ती पूर्णपणे खोटी आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.धरणामध्ये मंगळवारी ६७.५३ टीएमसी म्हणजे ८८.१० टक्के जलसाठा असून, आवक ४३०० क्युसेक होती. नाशिककडून येणाºया पाण्याची आवक मंदावली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाणी सोडल्याच्या अफवांमुळे गोदाकाठच्या अनेक गावांत एकच गोंधळ उडाला. पुराच्या भीतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची मागच्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.