शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालय बेभरोसे

By admin | Updated: February 9, 2015 00:46 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. कोणीही या अन् खुशाल हवी ती कागदपत्रे, साहित्य घेऊन जा

सोमनाथ खताळ , बीडयेथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. कोणीही या अन् खुशाल हवी ती कागदपत्रे, साहित्य घेऊन जा... अशी स्थिती आहे.हे कार्यालय आधीच चोरांच्या निशाण्यावर आहे. मात्र, अधिकारी ‘धडा’ घ्यायला तयार नाहीत. काम कमी अन् वसुली जादा या फंड्यामुळे कार्यालयाचा कारभार बेभरोसे असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ ने शनिवारी केलेल्या स्टींगमधून दिसून आले. धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाट्याजवळ आरटीओ कार्यालय आहे. शहराबाहेर असलेल्या या कार्यालयाची सुरक्षितता अक्षरश: वाऱ्यावर आहे. तीन महिन्यांपूर्वी या कार्यालयात संगणक चोरीची घटना घडली होती. त्यापूर्वी देखील चोरांनी येथे हात साफ केला होता. सध्या शहरात भरदिवसा दरोडे पडत आहेत. डोळ्यात चटणी फेकून लाखो रूपये लुटले जात आहेत. चोर पकडताना पोलिसांची तारांबळ उडत असताना आरटीओ कार्यालयही चोरांना निमंत्रण देत आहे. रात्रीच्या वेळेस केवळ एकाच सुरक्षारक्षकावर येथील संपूर्ण सुरक्षा अवलंबून असते. सुरक्षा पुरेशीआरटीओ कार्यालयात दिवसभरातील कामाचा सर्व लेखाजोखा रात्रीच्यावेळी संगणकात एकत्र केला जातो. तो व्हीपीएन कनेक्शनने मुख्य कार्यालयाला पाठविला जातो. त्यामुळे आमचे काही महत्वाची कागदपत्रे जाणार नाहीत, याची आम्ही पूर्णत: काळजी घेतो. पूर्णपणे सुरक्षितता असल्याचा दावा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी व्यक्त केला.शौचालयाचीही दुरवस्थाअधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी साधे शौचालय देखील नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अधिकाऱ्यांसह वानचालक उघड्यावरच लघूशंका करतात. महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होते. येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केलेली नाही.लोकमत चमूने शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात प्रवेश केला. यावेळी प्रवेशद्वाराजवळच संगणकावर काम सुरु होते. कार्यालयाला कुठेच सुरक्षाभिंत नाही. केवळ काट्या कुपाट्याच कार्यालयाची सुरक्षा करत आहेत. जुन्या वाहनांचा खच आहे. या वाहनांचे सुटे भागही जागेवर नस्सल्याचे दिसून आले. सर्वत्र उगावलेले गवत व केरकचरा अस्ताव्यस्त होता.