शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी निधीचे १९० कोटी परत

By admin | Updated: March 17, 2015 00:48 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. तांत्रिक कारणांमुळे निधी परत गेला असला तरी अर्थसंकल्पात तरतूद होऊन तो पुन्हा मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नासच्या खाली आलेली आहे. त्यामुळे शासनाने खरीप अनुदानापोटी शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज दिले आहे. विभागातील ४३ लाख शेतकऱ्यांना ही वैयक्तिक मदत मिळणार आहे. त्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारने यापैकी १६९० कोटी रुपयांचा निधी विभागास उपलब्ध करून दिला होता.७ मार्चपर्यंत त्यातील १५०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. शासनाने ही रक्कम आकस्मिकता निधीतून उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उरलेली रक्कम हिशेबासाठी शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार उरलेले १९० कोटी रुपये शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. आता अर्थसंकल्पात तरतूद होऊन ही रक्कम मराठवाड्याला पुन्हा दिली जाईल, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले. ४मराठवाड्यातील सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत.४आतापर्यंत २९ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित १४ लाख शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पाचशे ३२ कोटी रुपये निधी मिळणे आवश्यक आहे.