शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

कर्जाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक, महिलेसह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 7:30 PM

फसवणूक झालेल्या लोकांची संख्या शेकडो होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देतीन महिने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना चौथ्या महिन्यात कर्ज मिळेलधनादेश बँकेत वटण्यासाठी टाकला असता, तो अनादर झाला.

औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १४ लाख ८ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना गुरुवारी अटक केली. अटकेतील आरोपींविरोधात शुक्रवारी आणखी २५ तक्रारी पोलिसांकडे आल्या. आरोपींनी केलेली फसवणूक कोट्यवधींची असण्याची आणि फसवणूक झालेल्या लोकांची संख्या शेकडो होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

दीपाली मिसाळ, संतोष शामराव आव्हाळे (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि विजय पंढरीनाथ शिंदे (४०, रा. मुकुंदवाडी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यापैकी दीपाली मिसाळ ही नुकत्याच झालेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-२ मध्ये आरोपींनी प्राईम कृषी विकासनिधी नावाचे बँकेसारखे कार्यालय सुरू केले होते. बँक ांच्या कर्जाचा थकबाकीदार असणाऱ्या ग्राहकांनाही ते कर्ज देतो, असे सांगत. याकरिता तीन महिने ते त्यांच्याकडे विशिष्ट नियमित पैसे भरण्यास सांगत. तीन महिने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना चौथ्या महिन्यात कर्ज मिळेल, असे ते सांगत.

ही बाब समजल्यानंतर कापड व्यापारी सिद्दीक शफी अहेमद (रा. रहेमानिया कॉलनी) यांनी २५ फेब्रुवारी रोजी आरोपींची भेट घेतली आणि त्यांना साडेसात कोटी रुपये कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना  त्यांच्या कार्यालयात ४ लाख ८० हजार रुपये जमा केल्यास तुम्हाला आठ दिवसांत कर्ज देऊ असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सिद्दीक यांनी आरोपींच्या कार्यालयात ४ लाख ८० हजार रुपये जमा केले. आठ दिवसांनंतर सिद्दीक यांनी आरोपींकडे कर्जाविषयी विचारणा केली तेव्हा सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असल्याने एक दिवस थांबावे लागेल असे सांगितले.

यामुळे दुसऱ्या दिवशी सिद्दीक हे आरोपींच्या कार्यालयात जाऊन भेटले तेव्हा त्यांनी त्यांना कर्जाचा पहिला हप्ता म्हणून पावणे दहा लाखांचा धनादेश दिला. हा धनादेश त्यांनी बँकेत वटण्यासाठी टाकला असता, तो अनादर झाला. यामुळे सिद्दीक यांनी त्यांना फोन केला असता, आरोपींनी फोन घेण्यास टाळाटाळ केली. शिवाय ते कार्यालयातही भेटत नव्हते. यामुळे त्यांनी आरोपींविरोधात पोलिसांत तक्र ार नोंदविली. दुसरी तक्रार शेख अब्दुल खुद्दस यांनी दिली. त्यांच्या खातेदाराची ९ लाख रुपयांची, तर शेख अब्दुल यांची २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस