गोहत्या बंदीच्या विरोधात रिपाइंचा मोर्चा
By Admin | Updated: May 20, 2015 00:19 IST2015-05-20T00:07:35+5:302015-05-20T00:19:19+5:30
उदगीर : रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने मंगळवारी उदगीरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

गोहत्या बंदीच्या विरोधात रिपाइंचा मोर्चा
उदगीर : गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करून वाढत असलेल्या बेकारीला आळा घालण्याच्या मागणीासाठी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने मंगळवारी उदगीरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी, शेतमजूर, चर्मकार, खुरेशी या समाजघटकावर अन्याय होत असल्याने हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली़ या मोर्चाचे नेतृत्व रिपाई (आ़) चे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे यांनी केले़ या मोर्चासाठी प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशिलकुमार शिंदे, राहुल कांबळे, अमोल शृंगारे, नितीन गायकवाड यांच्यासह शहरातील खुरेशी समाजानी पुढाकार घेतला़ मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले़