शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

महाव्यवस्थापकांच्या भेटीमुळे रोटेगावरेल्वेस्थानक चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:40 AM

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव हे बुधवारी रोटेगाव रेल्वेस्थानकाला भेट देणार आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून स्थानकाच्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधा व रेल्वेबाबतच्या मागण्यांकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव हे बुधवारी रोटेगाव रेल्वेस्थानकाला भेट देणार आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून स्थानकाच्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधा व रेल्वेबाबतच्या मागण्यांकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.रोटेगाव रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या १७ गाड्यांपैकी केवळ सहाच गाड्यांना रोटेगाव येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबई, तिरुपतीकडे जाणाºया गाड्यांना रोटेगावला थांबा नसल्याने भाविक, व्यापारी वर्गासह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. रोटेगावला थांबा मिळवण्यासाठी प्रवासी संघटनांची मागणी जोर धरत आहे. जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या वैजापूर तालुक्यासाठी व जिल्ह्यातील एकमेव तालुक्याला असलेल्या रेल्वेस्थानकांवर सोयींची वानवा असल्यामुळे प्रवाशी वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. महाव्यवस्थापक येणार म्हणून रोटेगाव रेल्वेस्थानक इमारतीची रंगरंगोटी, अंतर्गत स्वच्छता, रेल्वे ट्रॅकची साफसफाई व इतर कामे करण्यात आली आहेत. रोटेगाव रेल्वेस्थानकातुन दररोज साधारणपणे दोन हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्याकडून रेल्वेला दररोज साधारणपणे चाळीस ते पन्नास हजार रुपये याप्रमाणे वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत प्रवाशांना सोयी मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. येथे ७ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत गळती असल्याने पाणीसाठा केला जात नाही. परिणामी, प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. येथील स्वच्छतागृहे अस्वच्छतेचे आगार बनले आहेत. प्रतीक्षालयांचा वापर होत नसल्याने महिला प्रवांशाची गैरसोय होते. याशिवाय रोटेगाव रेल्वेस्थानकावर केवळ अजंता एक्स्प्रेस, काकिनाडा एक्स्पेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदिग्राम, देवगिरी व अंजनी या फास्ट गाड्यांना थांबा देण्यात आला आहे; पण मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस, तिरुपतीला जाणारी तिरुपती शिर्डी, तिरुपती नगरसोल, अजमेर एक्स्प्रेस, नरसापूर, कोल्हापूर, चेन्नयी सुपरफास्ट, विशाखापट्टणम, सचखंड, पुणे सुपरफास्ट या गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रेल्वेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाºया रोटेगाव रेल्वेस्थानकाला पाने पुसली जात असल्याने मागील अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवाशांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या कधी पूर्ण करणार, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.शिर्डीला जाण्यासाठी रोटेगाव रेल्वेस्थानक महत्त्वाचे आहे; पण लोकप्रतिनिधी आणि शासकीय उदासीनतेमुळे रोटेगावचे रेल्वेस्थानक डबघाईस आले आहे. रोटेगाव रेल्वेस्टेशन बºयाच मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. रेल्वेच्या पुढाकाराने रोटेगाव रेल्वेस्थानकात गेल्या दोन दिवसांपासून रंगरंगोटी, साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. उशिराने का होईना; पण स्थानकाची दुरुस्ती सुरू झाल्याने ‘देर से आये, दुरुस्त आये’ म्हणायची वेळ वैजापूरकरांवर आली आहे.रोटेगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांना विविध समस्या भेडसावत असल्यामुळे रेल्वेच्या विकासात्मक ‘अच्छे दिन’चा नारा फोल ठरत असल्याची ओरड प्रवासी करीत आहेत. रोटेगाव रेल्वेस्थानकावर नगरसोल-नरसापूर, ताडोबा एक्स्प्रेस, तिरुपती एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी वैजापुरातील विविध संघटना आणि जनतेद्वारे वेळोवेळी करण्यात आली होती; परंतु जनतेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने थेट केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी