विहिरीत सापडला कुजलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:10 IST2017-10-04T01:10:37+5:302017-10-04T01:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दौलताबाद : मुंबई- नागपूर महामार्गाजवळील आसेगाव शिवारात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची ...

विहिरीत सापडला कुजलेला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
दौलताबाद : मुंबई- नागपूर महामार्गाजवळील आसेगाव शिवारात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि.३) घडली.
दौलताबाद पोलिसांनी सांगितले की, आंबेगाव येथील रहिवासी शांताराम थोरात हे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना काही ग्रामस्थ विहिरीजवळ उभे दिसले. त्यांनी विहिरीजवळ जाऊन बघितले असता विहिरीत एक मृतदेह आढळून आला.
ही माहिती त्वरित दौलताबाद पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोनि. विवेक सराफ, पोउनि. संजय मोन्टे, आर.के. पाटे, हवालदार काळे, पोपट दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून, कमरेच्या वरील भागाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. तपास पोउनि. दिनेश सूर्यवंशी, दहिफळे हे करीत आहेत.