शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2025 19:30 IST

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना !

छत्रपती संभाजीनगर : ‘शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायीपाणी" असा समज बळावत चालला आहे. अतिशुद्ध पाणीच आरोग्य बिघडवत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. आपल्या शुद्ध पाण्याविषयीच्या समजाला हे धक्का देणारं आहे. आरओ फिल्टरमधून मिळणाऱ्या अगदी कमी टीडीएस असलेल्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेलं पाणी दोन्ही अपायकारक असू शकतं. त्यामुळे सावधान! ‘शुद्धते’च्या अतिरेकाने आपलं आरोग्य धोक्यात तर येत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकमतने शनिवारी शहरातील सिडकोतील जलकुंभ, छावणी-टिळकनगरातील आरो केंद्र, मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील हॉटेल, क्रांती चौकातील दुकान, पुंडलिनगरातील नळाचे पाणी व बीड बायपास येथील बोर, विहिरीचे व आरोच्या पाण्याची ‘टीडीएस’ चाचणी केली. यात अवघ्या ३० ते ४३० मि.ग्रॅ/लि. पर्यंतचे टीडीएस आढळून आले. आरो जार केंद्रात ३० ते ६० मि.ग्रॅ/लि. दरम्यान टीडीएसचे प्रमाण आढळून आले. मनपाच्या जलकुंभातील पाण्यात ३५० टीडीएस आढळून आले. याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर काय म्हणाले...१) पाण्यातील टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) म्हणजे पाण्यात विरघळलेले घनद्रव्य होय.२) पिण्याच्या पाण्यात आदर्श टीडीएसचे प्रमाण ५० ते १५० मि.ग्रॅ/लि. असले पाहिजे.३) ५० पेक्षा कमी टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला फिकट व नीरस लागते.४) १५० पेक्षा जास्त टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला कडवट लागते.५) पाण्यात कमी टीडीएस असेल तर कॅल्शियम, सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम वेगवेगळ्या खनिजांची मात्रा, शरीरात कमी होऊ शकते.६) कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ होतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. उदा. सोडियम कमी झाले तर चक्कर येऊ शकते.७) जास्त टीडीएसचे पाणी पिले तर खनिजांचे रक्तातील प्रमाण वाढू शकते. उदा. पोटॅशियम वाढले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.८) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३०० मि.ग्रॅ./लि. पेक्षा कमी टीडीएस असल्यास ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.९) पाण्याचे टीडीएस जास्त असल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. तसेच किडनीचे आजार होऊ शकतात.१०) जास्त टीडीएसचे पाणी पिणाऱ्यांमध्ये मुतखड्याचे आजार जास्त दिसून येतात.

पिण्याच्या पाण्यात आढळणारे रासायनिक व जैविक घटक व त्यांचे शरीरावर होणारे परिणामस्त्रोत : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील पाणी तपासणी प्रयोगशाळेतून मिळालेली माहिती.घटक (द्रव्य) - अतिरिक्त असल्यास शरीरावर होणारे परिणाम१) विरघळलेले क्षार (टीडीएस)- हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, कर्करोगाचे आजार, पचनसंस्थेतील बिघाड.२) कठीणपणा - त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचारोग, मुतखडा३) अल्कलायनिटी - उलटी, अस्वस्थता४) क्लोराइड- पाण्यात खारटपणा जाणवतो.५) कॅल्शियम--- त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचा रोग, मुतखडा६) फ्लोराइड---हाडांचा ठिसूळपणा, उच्च रक्तदाब, दंतक्षय, दातांचा पिवळेपणा.७) लोह-- मधुमेह, पोटाचे विकार, फफ्फुस, पचनग्रंथी, हृदयाचे विकार.८) नायट्रेट- ब्लू बेबी सिंड्रोम.९) सल्फेट- हगवण लागणे.१०) कोलीफॉर्म--- उलट्या, मळमळ, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ......................................... 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीHealthआरोग्य