रानडुकरांचा धिंगाणा
By Admin | Updated: March 19, 2015 00:18 IST2015-03-18T23:59:24+5:302015-03-19T00:18:26+5:30
धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.

रानडुकरांचा धिंगाणा
धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.
गावाजवळील नदीपात्राला चिकटून दाट झाडी आहे. जवळच मक्याचे शेत आहे. पिकांवर ताव मारून दाट झाडीत रानडुकरे आश्रय घेतात. सकाळी ११ वाजता शेतात जाणाऱ्या सहा तर सायंकाळी सहा वाजता शेतातून परतणाऱ्या तिघांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला. काहींचा चावा घेतला तर काहींना डोक्याने ठोस दिली. त्यामुळे कळपाच्या कचट्यात सापडलेले महिला-पुरूष रक्तबंबाळ झाले.
यांचा जखमींत समावेश
प्रवीण अशोक लोखंडे, महादेव सर्जेराव जगताप, अंकुश श्रीकृष्ण गोतावळे, श्रीकांत अंकुश जगताप, नारायण धोत्रे, गोविंद सुदाम नखाते यांच्यावर सकाळी हल्ला झाला. यापैकी प्रवीण व महादेव यांच्यावर स्वारातीत तर इतरांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायंकाळी रेणुका नारायण धोत्रे, भाग्यश्री अंकुश जगताप, सुशीला सिरसट या जखमी झाल्या.
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. शिंदे म्हणाले, रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल. (वार्ताहर)
आवरगावचे उपसरपंच अमोल जगताप यांनी वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच रानडुकरांचा धुमाकूळ वाढल्याचा आरोप केला.
४रात्री उशिरापर्यंत अधिकारी गावात पोहचले नव्हते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली आहे.