तेलंगणात जाणारे रॉकेल पकडले
By Admin | Updated: September 28, 2014 23:52 IST2014-09-28T23:38:31+5:302014-09-28T23:52:06+5:30
धर्माबाद : घरगुती निळ्या रंगाचे अवैध रॉकेल तेलंगणात जात असताना स्थानिक पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४़४५ वाजता बन्नाळी चौक येथे पकडला़

तेलंगणात जाणारे रॉकेल पकडले
धर्माबाद : घरगुती निळ्या रंगाचे अवैध रॉकेल तेलंगणात जात असताना स्थानिक पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४़४५ वाजता बन्नाळी चौक येथे पकडला़ आॅटोसह रॉकेल जप्त केला असून आॅटोचालकास अटक केली़ पण प्रमुख मालक मात्र फरार झाला आहे़
ही गुप्त माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनंत पराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार जेक़े़ बोधणे, के़एस़आडे, एमक़े़ कवठेकर यांनी सापळा रचून तेलंगणातील तानूरकडे जाणारा आॅटो क्ऱए़पी़०१-व्ही़९०६२ पकडला़ या आॅटोत अवैध ३५ लिटर रॉकेलचे प्लास्टीक २० कॅन होते़ म्हणजे एकूण रॉकेल ७०० लिटर होते़ याची शासकीय किंमत १२ हजार ३४६ रुपये आहे़ अवैध रॉकेल निदर्शनास आल्याने आॅटोसह किंमत ४७ हजार ३४६ रुपये जप्त केले़
आॅटोचालक सय्यद युनूस सय्यद शब्बीर (राक़ुटागली धर्माबाद) याला अटक करण्यात आली़ यांच्याजवळ रॉकेल कुठून आला, तो दुकानदार कोण आहे, याचा शोध पोलिस घेत असून रॉकेल दुकानदारात घबराहट पसरली आहे़ पोलिस उपनिरीक्षक शंकर वाधमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक अनंत पराड तपास करीत आहेत़ (वार्ताहर)