राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहनला गोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:49 IST2018-01-07T00:49:24+5:302018-01-07T00:49:45+5:30

सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबाद येथील रोहन टाक याने गोल्डन कामगिरी केली.

Rohanla Gold in the state level boxing competition | राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहनला गोल्ड

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहनला गोल्ड

ठळक मुद्देसूरजला रौप्य : श्रुती, सानिया यांना कास्य

औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबाद येथील रोहन टाक याने गोल्डन कामगिरी केली. त्याचप्रमाणे सूरज साळवे याने रौप्य, तर श्रुती लोहार आणि सानिया नटू यांनी कास्यपदकाची कमाई केली.
रोहन टाक याने ९१ वजन गटात सुवर्णपदक जिंकले, तर सूरज साळवे याने ५२ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. श्रुती लोहारने ५४ आणि सानिया नटू हिने ६४ किलो वजन गटात कास्यपदकाची कमाई केली.
या यशाबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, शहर बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षा केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, डॉ. प्रदीप खांडरे, नीरज भारसाखळे, बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल टाक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Web Title: Rohanla Gold in the state level boxing competition