चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय तरुणांना लुटले

By Admin | Updated: June 18, 2014 01:36 IST2014-06-18T01:25:05+5:302014-06-18T01:36:07+5:30

औरंगाबाद : गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठविण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून तिघा जणांनी त्यांच्या खिशातील ५२ हजार रुपये लुटले.

Robbery strangers killed with knife | चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय तरुणांना लुटले

चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय तरुणांना लुटले

औरंगाबाद : गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठविण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून तिघा जणांनी त्यांच्या खिशातील ५२ हजार रुपये लुटले. ही घटना मंगळवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनजवळ क्रांतीचौक रोडवर घडली.
ब्रिजेश रामब्रीश यादव (२४, ह. मु. लासूर स्टेशन, रा. बिहार) व रामकृपाल यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे दोघेजण सद्गुरू साई एज्युकेशन संस्थेत लासूर स्टेशन, डोणगाव येथे नोकरी करतात. ब्रिजेश व रामकृपाल हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून येथे सोबत एकाच रूममध्ये राहतात. त्यांना गावी आई-वडिलांना पैसे पाठवायचे होते. त्यासाठी दोघेही लासूर स्टेशन येथून आज मंगळवारी सकाळी ८.३० वाजता रेल्वेने औरंगाबादकडे निघाले. येथे ९.३० वाजता उतरल्यानंतर ते रेल्वेस्टेशन परिसरातील भारतीय स्टेट बँकेत गेले. तेव्हा बँक बंद होती.
वेळ घालवण्यासाठी म्हणून ते रेल्वेस्टेशनबाहेर नाश्ता करण्यासाठी एका केळी विक्रेत्याच्या गाडीवर गेले. तेथे दोघे जण आले व रामकृपाल यास म्हणाले की, माझ्या बहिणीला चाकू मारणारा तुझ्यासारखाच माणूस आहे. तू तिकडे आमच्या बॉसकडे चल. तेव्हा रामकृपालने खिशातून १९ हजार रुपये काढले व ते ब्रिजेश यादव याच्याकडे दिले.
ते पाहून त्या दोन भामट्यांनी तुलाही तिकडे यावे लागेल, असे म्हणत रामकृपाल व ब्रिजेश या दोघांना क्रांतीचौक रोडवरून अंतर्गत रस्त्याला नेले. तेथे या दोघांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवला व ब्रिजेशच्या खिशातून ५२ हजार रुपये काढून त्यांना हाकलून दिले.

Web Title: Robbery strangers killed with knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.