मारहाण करून सव्वा लाख लुटले

By Admin | Updated: October 29, 2015 00:24 IST2015-10-29T00:10:05+5:302015-10-29T00:24:02+5:30

केज : येथून धारूरकडे जाणाऱ्या जीपमधील पाच लोकांनी लातूर येथील व्यापाऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली.

Robbery robbed millions of millions | मारहाण करून सव्वा लाख लुटले

मारहाण करून सव्वा लाख लुटले


केज : येथून धारूरकडे जाणाऱ्या जीपमधील पाच लोकांनी लातूर येथील व्यापाऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी केज ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
लातूर येथील व्यापारी महेश रूद्रवार हे केज येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास आले होते. त्यांना धारूर येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी जायचे होते. केज बसस्थानकावर थांबले असताना तेथे एक जीप आली. जीप धारूरकडे जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे महेश रूद्रवार व त्यांचे सोबती मस्के हे दोघे जीपमध्ये बसले. कासारी फाट्यादरम्यान जीपमधील पाच जणांनी त्या दोघांना मारहाण करत सोनसाखळी, दोन मोबाईल, नगदी रोख ३३ हजार असा एकूण १ लाख ३० हजार ९५० रूपयांचा ऐवज लुटला. (वार्ताहर)

Web Title: Robbery robbed millions of millions