शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चालकास धमकावून कार पळविणारे दरोडेखोर २४ तासात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 20:00 IST

आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

ठळक मुद्देगौताळा अभयाण्याजवळून चालकाकडून कार, मोबाईल रोकड लुटली पोलिसांना रोपी हे वडगांव कोल्हाटी येथे थांबल्याची माहिती मिळाली

औरंगाबाद: पुणे येथे जायचे असल्याचे सांगून कारमध्ये बसलेल्या पाच जणांनी कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यात  कारचालकास धमकावत त्यांचे दोन मोबाईल,रोख दिड हजार रुपये आणि  कार हिसकावून नेण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर अवघ्या २४ तासांत ग्रामीण पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली.त्यांनी लुटलेली कार, दोन मोबाईल जप्त केले. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

अरविंद प्रेमचंद राठोड(रा.रिठ्ठी मोहडा), पंकज ब्रम्हदेव जाधव(गुदमातांडा)आणि संदीप शिवलाल राठोड(रा. मोहरड तांडा, ता. कन्नड)अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, बाबासाहेब साहेबराव शिंदे (रा. माऊलीनगर, हडपसर, पुणे) हे टॅक्सीचालक आहे. जस्ट डायल या संकेतस्थळावरून निकम नावाच्या व्यक्तीने पुणे येथे जाण्यासाठी कार बुकींग केल्याचा निरोप शिंदे यांना मिळाला. यामुळे १७ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिंदे हे वाळूज एमआयडीसीतील आंबेडकर चौकात गेले. तेथे त्यांना तीन अनोळखी व्यक्ती भेटले आणि कन्नड येथील दोन मित्रांना सोबत घेऊन पुणे येथे जायचे असल्याचे ते म्हणाले.  यामुळे त्यांना कारमध्ये बसवून शिंदे हे कन्नड येथे गेले. तेथे अन्य दोन जणांना कारमध्ये बसविल्यानंतर सर्वांनी एका हॉटेलवर जेवण केले.

यावेळी त्यांनी सायगाव येथील कार्यालयातून काही सामान घ्यायचे असल्याचे सांगून त्यांनी कार गौताळा अभयाण्याकडे कार घेण्यास सांगितले. अभयारण्यातून कार जात असताना त्यांनी लघूशंकेसाठी कार थांबायला लावली. यानंतर सर्वांनी अचानक शिंदे यांना धमकावत त्यांचे दोन मोबाईल, दिड हजार रुपये आणि कारची चावी हिसकावून घेतली आणि त्यांना तेथेच सोडून आरोपी कार घेऊन पसार झाले. याघटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भागवत फुंदे आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला तेव्हा आरोपी हे वडगांव कोल्हाटी येथे थांबल्याचे समजले. तेथून काही अंतरावर त्यांनी कार लपवून ठेवल्याचे दिसले. या कारच्या परिसरात १८ जुलै रोजी पोलिसांनी सापळा रचला तेव्हा सायंकाळी चार जण कारजवळ येताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली तेव्हा एक जण अंधारात पळून गेला. यावेळी पळविलेली कारसह दोन मोबाईल आणि दिड हजार रुपये पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले.

यांनी केली कारवाईही कामगिरी पोलीस निरीक्षक फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी झिया सय्यद, गणेश मुळे, बाळू पाथ्रीकर,नवनाथ कोल्हे,विक्रम देशमुख, संजय भोसले, शेख नदीम, राहुल पगारे, बाबासाहेब नवले,गणेश गांगवे, योगेश् ातरमाळे, नरेंद्र खंदारे, संजय तांदळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद