लिंबेगावजवळ दुचाकीस्वारास मारहाण करुन लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:54 IST2019-07-20T22:54:13+5:302019-07-20T22:54:39+5:30
लघुशंकेसाठी थांबलेल्या ५५ वर्षीय दुचाकीस्वारास चार चोरट्यांनी मारहाण करीत मोबाईल व ५०० रुपये हिसकावून घेतले.

लिंबेगावजवळ दुचाकीस्वारास मारहाण करुन लुटले
वाळूज महानगर : रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या ५५ वर्षीय दुचाकीस्वारास चार चोरट्यांनी मारहाण करीत मोबाईल व ५०० रुपये हिसकावून घेतले. ही घटना शुक्रवार रात्री लिंबेजळगावजवळ घडली.
शेख अरमान शेख बिºहाम (५५ रा.पुरी, ता.गंगापूर) हे बीएलजी कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी कंपनीतून सुटी झाल्यानंतर शेख अरमान हे दुचाकीने (एम.एच.२०-ई.ए.९७२०) घरी पुरी गावाकडे चालले होते.
लिंबेजळगाव जवळील मराठवाडा ढाबा परिसरात रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते लघु शंकेसाठी थांबले. त्याचवेळी अंधारात आलेल्या चौघांनी शेख अरमान यांना मारहाण केली. यातील एकाने शेख अरमान यांना चाकूचा धाक दाखवत मोबाईल व ५०० रुपये हिसकावून घेतले. यानंतर त्यांचे हातपाय बांधून त्यांची दुचाकी घेऊन पसार झाले.
परिसरात सुरु असलेल्या बांधकाम ठिकाणावरील सुरक्षा रक्षकांनी त्यांची मदत केली. त्यांनी पोलिसांनी घटनेची माहिती कळविली. या प्रकरणी शेख अरमान यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चौघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.