मुलींना सतावणारा रोडरोमिओ गजाआड

By Admin | Updated: September 13, 2014 23:05 IST2014-09-13T22:52:44+5:302014-09-13T23:05:28+5:30

परभणी : फोनवरुन मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका रोडरोमियोला रणरागिनी पथकाने गजाआड केले आहे.

RoadRomio GazaAd to the girls | मुलींना सतावणारा रोडरोमिओ गजाआड

मुलींना सतावणारा रोडरोमिओ गजाआड

परभणी : फोनवरुन मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका रोडरोमियोला रणरागिनी पथकाने गजाआड केले आहे.
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील रणरागिनी पथकाकडे ७ सप्टेंबर रोजी एका मुलीचा अर्ज आला होता. त्यानुसार अज्ञात व्यक्ती मुलींना शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले.
रणरागिनी पथकाने जेव्हा या व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधला तेव्हा त्याने पथकालाच पकडण्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पिंपळा येथील उमेश दिगंबर पोले (ता.औंढा नागनाथ) या २० वर्षीय तरुणास त्याच्या गावातच १० सप्टेंबर रोजी सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईतून वेळोवेळी आपला फोन क्रमांक व जागा बदलणाऱ्या रोडरोमिओस पथकाने अद्दल घडविली.
सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयश्री कातडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांचाळ, आव्हाड, महिला पोलिस शिपाई जाधव, शिंदे, पोलिस नायक रेड्डी, जरार यांनी केली. नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उबरहांडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: RoadRomio GazaAd to the girls