लासूर स्टेशन बाजारपेठेतील रस्त्याचे काम निकृष्ट
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:06+5:302020-12-04T04:14:06+5:30
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन बाजारपेठेतील सिमेंट रस्ता व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात ...

लासूर स्टेशन बाजारपेठेतील रस्त्याचे काम निकृष्ट
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन बाजारपेठेतील सिमेंट रस्ता व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. त्यात काही दिवसांपासून रस्त्याचे कामही बंद पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लासूर स्टेशन (ता. गंगापूर) ही औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिक खरेदी विक्रीसाठी येतात. मात्र, बाजारपेठेतील आनंद दिघे चौक ते रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम सुरू झाले होते; परंतु कंत्राटदाराने अभियंत्यांशी मिलीभगत करीत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. अर्थात हलक्या दर्जाचे सिमेंट, गज, मातीमिश्रित वाळू आदी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याचे सांगितले आहे.
रेल्वे गेट ते सिरेगावपर्यंत डांबरीकरणाचे कामही नुकतेच सुरू झाले होते. या रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदाराने जाड खडी व अत्यंत कमी प्रमाणात डांबराचा वापर केला असून, थातूरमातूर व अर्धवट काम करून कंत्राटदाराने धूम ठोकली. तरीही संबंधित विभाग, अभियंता, लोकप्रतिनिधीची यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
कोट
गेल्या एक ते दीड महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार आहोत.
-नितीन कांजुणे, शिवसेना माजी शहरप्रमुख, लासूर स्टेशन
फोटो -