पाण्यासाठी महामार्गावर रास्तारोको

By Admin | Updated: May 2, 2016 23:49 IST2016-05-02T23:43:46+5:302016-05-02T23:49:48+5:30

गेवराई : तालुक्यातील खांडवी येथे पाण्याचे टँकर मंजूर करावे, या मागणीसाठी सोमवारी कल्याण विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर खांडवी फाटा येथे गावकऱ्यांनी रास्ता रोको केला.

Road to the water on the highway | पाण्यासाठी महामार्गावर रास्तारोको

पाण्यासाठी महामार्गावर रास्तारोको

गेवराई : तालुक्यातील खांडवी येथे पाण्याचे टँकर मंजूर करावे, या मागणीसाठी सोमवारी कल्याण विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर खांडवी फाटा येथे गावकऱ्यांनी रास्ता रोको केला.
खांडवीत पाणी योजना आहे, पण पाण्याअभावी योजना बंद आहे. पाण्याअभावी गावकऱ्यांचे हाल होत आहेत. गावात टँकरद्वारे पाणी पुरवावे, अशी मागणी केली होती; पण गावकऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त महिला- पुरुषांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. रघुनाथ थोरात, अशोक नाईकवाडे, गोपाल शिंदे , भागवत कोल्हे, लक्ष्मी थोरात, नंदाबाई भोले, हौसाबाई भोले, सुनीता सोनवणे, मंगल लोखंडे, शेख हनीफा, कमल वीर आदींचा सहभाग होता. आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. नायब तहसीलदार वैजीनाथ जोशी यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Road to the water on the highway