रस्त्याला घोटाळ्याचा सुरु ंग
By Admin | Updated: August 17, 2016 00:52 IST2016-08-17T00:12:20+5:302016-08-17T00:52:12+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की घोटाळे आणि निकृष्ट कामांची मालिका संपता संपणार नाही. या विभागाची प्रतिमा चांगली असावी,

रस्त्याला घोटाळ्याचा सुरु ंग
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की घोटाळे आणि निकृष्ट कामांची मालिका संपता संपणार नाही. या विभागाची प्रतिमा चांगली असावी, यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे देखील प्रयत्न करीत आहेत; परंतु प्रतिमा गुणवत्तापूर्ण होता होत नाहीये. विभागाचे अब्रूचे धिंडवडे काढणारे एक प्रकरण चर्चेत आले आहे. आडगाव-लिंगदरी या गावासाठी असलेल्या रस्त्याला घोटाळ्याचा सुरुंग लागला आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील आडगाव-लिंगदरी या गावातील रस्ता दीड वर्षांपूर्वीच पूर्ण करून तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे; परंतु तो रस्ता अर्धवट असल्याने व चौकशी होण्याच्या भीतीने बांधकाम विभाग, वनविभागाची परवानगी न घेता त्या रस्त्याच्या तत्कालीन अधिकारी, कंत्राटदाराने तेथे विनापरवाना घाट फोडण्यासाठी सुरूंग लावण्याचे काम हाती घेतले.
नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातच घडला. ६५ लाखांमध्ये त्या रस्त्याचे काम देण्यात आले होते. त्या कामाचे पूर्ण बिल वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुका लागल्यामुळे थातुरमातुर पद्धतीने ते काम करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी त्यामध्ये हात धुऊन घेतले. परंतु रस्त्याचे काम अर्धवट राहिले.
रस्त्याच्या कामाबाबत गावकऱ्यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कामाचे बिंग फुटले. गेल्या आठवड्यात सुरूंग लावून त्या रस्त्याच्या आड येणारी टेकडी फ ोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही जेसीबीने त्या रस्त्याचे काम विनापरवाना करणे सुरू होते.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, त्या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. टेंडरमध्ये जेवढी रुंदी होती, तेवढ्या रुंदीचे काम झाले नाही. घाट फोडून रस्ता करायचा होता. ६५ लाख रुपयांचे पूर्ण बिल विभागाने अदा केल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता पूर्ण करून घेण्यात येईल. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रकार घडला आहे. कामाच्या वेळी असलेले काही वरिष्ठ ते कनिष्ठ अभियंते बदलून गेले आहेत. विनापरवाना सुरूंग लावण्यात आल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला.