रस्ता प्रश्नी स्रान आंदोलन

By Admin | Updated: May 15, 2017 23:43 IST2017-05-15T23:38:06+5:302017-05-15T23:43:09+5:30

बीड : जिल्हा रुग्णालय ते जुने अधीक्षक कार्यालय या दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

Road problem movement | रस्ता प्रश्नी स्रान आंदोलन

रस्ता प्रश्नी स्रान आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालय ते जुने अधीक्षक कार्यालय या दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर स्रान करून अनोखे आंदोलन केले.
यावेळी एस. एम. युसूफ, सय्यद मोहम्मद इलियास, हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी आदींची उपस्थिती होती. या रस्त्याची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाले असून, प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुरूस्ती होत नाही. त्यामुळे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्रान आंदोलनाचा मार्ग निवडला. न.प. सीओंना निवेदनही देण्यात आले.

Web Title: Road problem movement