केळगाव ते कोळी वस्ती रस्ता बनला चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:05 IST2021-09-26T04:05:56+5:302021-09-26T04:05:56+5:30
दरवर्षी पावसाळा सुरू होताच कोळी वस्ती येथील नागरिकांना शेतकरी व नागरिकांना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागतो. येथील रस्त्याची दुरुस्ती ...

केळगाव ते कोळी वस्ती रस्ता बनला चिखलमय
दरवर्षी पावसाळा सुरू होताच कोळी वस्ती येथील नागरिकांना शेतकरी व नागरिकांना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागतो. येथील रस्त्याची दुरुस्ती केली जावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. पावसाच्या पाण्याने रस्ता पूर्ण चिखलमय झाल्याने तीन किलोमीटर पायदळी तुडवत जावे लागते.
कोट
खडतर रस्त्यातून पायी मार्ग काढावा लागत आहे. नागरिकांना रस्त्यासाठी खडतर सामना करावा लागत आहे. आम्हा शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकाचे हाल होत असून प्रशासनाने याकडे लक्ष घालून रस्ता बनवून द्यावा, अशी मागणी आहे.
- हारिदास सपकाळ, कोळी वस्ती, ग्रामस्थ.
-----
एकीकडे शासनाचे ध्येय धोरण गाव तिथं एसटी. घर तिथे लाइट व वस्ती तिथे रस्ता असे असल्याचा गाजावाजा केला जातो; परंतु प्रत्यक्षात केळगाव तर दिसून येत नाही. कोळीवस्ती चांगल्या रस्त्यासाठी प्रतीक्षा करीत आहे.
- विजय पवार, केळगाव.
250921\img-20210925-wa0018.jpg
केळगाव ते कोळी वस्ती येथील रस्ता बनला चिखलमय नागरीकांचे अतोनात हाल