शहरात रस्ते विकासाची ‘उड्डाणे’
By Admin | Updated: August 21, 2014 00:12 IST2014-08-21T00:06:00+5:302014-08-21T00:12:54+5:30
औरंगाबाद : वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर उड्डाणपुलाची कामे झाल्याने शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे
शहरात रस्ते विकासाची ‘उड्डाणे’
औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा आणि परिसराचा चेहरामोहराच बदलला असून, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर उड्डाणपुलाची कामे झाल्याने शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांत उड्डाणपुलाच्या बाबतीत शहरातील वातावरण अनुकूल बनले असून, सात उड्डाणपुलांची कामे मार्गी लागली आहेत. येत्या दोन वर्षांत शहरात आणखी तीन उड्डाणपुलांची भर पडणार असल्याने हे शहर विकासाच्या बाबतीत उड्डाण घेत असल्याचे दिसत आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी औरंगाबादचे तत्कालीन आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या १६७ कोटी रुपयांच्या एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत औरंगााबाद शहरासाठी रस्ते, सबवे, ंिरंग रोड, उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, लिंक रोड असा विकासाचा पेटाराच उघडला गेला. त्याअंतर्गत सर्वप्रथम लाडगाव आणि झाल्टा या शहराच्या परिसरात रेल्वे उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले. त्याच वेळी जालना रोडवरील सेव्हन हिल येथे उड्डाणपुलाचे काम झाले. रेल्वेस्टेशनजवळही पैठण रोडला जोडणारा उड्डाणपूल झाला. ही सर्व कामे वेगाने सुरू झाली. एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत टाऊन हॉल येथे उड्डाणपूल झाला. त्यामुळे सेव्हन हिल, रेल्वेस्टेशन, टाऊन हॉल येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली.
क्रांतीचौक उड्डाणपूल
शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या क्रांतीचौकातील रेल्वेस्टेशन ते पैठणगेट आणि बाबा पेट्रोलपंप ते सिडकोकडे जाणारी वाहतूक लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याने या चौकात २००८ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला. ४५४ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे बांधकाम बरेच दिवस रखडले. मात्र, हा पूल जुलै २०१२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला.
काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागला असला तरी यामुळे वाहतुकीची कोंडी फुटली.