छोट्या कंत्राटदारांमुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:36 IST2017-11-14T00:36:01+5:302017-11-14T00:36:10+5:30
आतापर्यंत रस्त्याची कामे ही छोट्या कंत्राटदारांमार्फत करण्यात आली़ या कंत्राटदारांनी तंत्रज्ञान वापरले नाही़ केवळ बिले काढण्यापुरतीच कामे झाली़ परिणामी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली, असे सांगून आता या पुढे ५० किमीच्या खाली रस्ता बांधणीच्या निविदा काढल्या जाणार नाहीत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली़

छोट्या कंत्राटदारांमुळे रस्त्यांची दुरवस्था
परभणी दौरा: चंद्रकांत पाटील यांनीच केला आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आतापर्यंत रस्त्याची कामे ही छोट्या कंत्राटदारांमार्फत करण्यात आली़ या कंत्राटदारांनी तंत्रज्ञान वापरले नाही़ केवळ बिले काढण्यापुरतीच कामे झाली़ परिणामी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली, असे सांगून आता या पुढे ५० किमीच्या खाली रस्ता बांधणीच्या निविदा काढल्या जाणार नाहीत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली़
परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ यावेळी अधिकाºयांची बैठक आटोपल्यानंतर परतत असताना पत्रकारांनी त्यांना बोलते केले. यावेळी परभणी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला तेव्हा पाटील म्हणाले, रस्त्यावरील खड्डे हे आताचे नाहीत़ मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला बजेट नव्हते़ प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात खड्डे बुजविले जात असे़ यावर्षीही हे काम हाती घेतले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत सर्व रस्त्यांचे सुदृढीकरण केले जाईल, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून रस्त्याची दहा नवीन कामे करण्यात येतील़ आजच्या बैठकीत या कामांना मंजुरी दिली आहे़ जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले़ राज्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्राकडून ३० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे़ राष्ट्रीय महामार्गासाठी प्रती किलोमीटर ८ कोटी रुपये आणि राज्य मार्गासाठी प्रतिकिलोमीटर ३ कोटी रुपये या प्रमाणे किमान १० हजार किलोमीटर रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यासाठी एका दिवसात एक कि.मी. रस्त्याचे काम अत्याधुनिकपद्धतीने करणारी मशीन उपलब्ध केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.