शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी खर्चून केलेल्या आझाद चौक ते रोशनगेट रस्त्याचा वापर वाहनतळ म्हणूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:37 IST

अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने निधी नसतानाही दोन टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण केले.आझाद चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे झाली आहेत.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : सिडको- हडकोतील नागरिकांना जुन्या शहरात येण्या- जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आझाद चौक ते रोशनगेट होय. चार वर्षांपूर्वी महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून हा सिमेंट रस्ता तयार केला; परंतु सध्या या रस्त्याचा वापर निव्वळ वाहनतळ म्हणून केला जातोय. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होतो. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली; पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.

आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत डीपी रोडची अवस्था वाईट होती. लोकप्रतिनिधी व  नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेसमोर आंदोलने केली. त्यामुळे महापालिकेने निधी नसतानाही दोन टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण केले. पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला; परंतु काम पूर्ण होत नसल्यामुळे आणखी एक कोटी रुपये देण्यात आले. अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय. 

रस्त्याच्या मध्यभागी पार्किंगकिराडपुऱ्यातील राममंदिरापासून दरबार हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मध्यभागी मोठमोठी चारचाकी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे रस्त्याचा वापर पाच ते सात फुटांपर्यंत सीमित होतो. त्यातून दुचाकी आणि रिक्षा  ये-जा करता येऊ शकतात; पण चारचाकी वाहनधारकांना येथून मार्ग काढताना कसरत करावी लागते.   

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणेरोशनगेटपासून पुढे काही अंतरावर सिमेंट रस्ता सुरू होतो. पुढे आझाद चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे झाली आहेत.  छोट्या हॉटेलसमोरील वाहने तर थेट रस्त्यावरच उभी राहतात. वाहतूक पोलीस आणि महापालिकेने दोन ते तीन वेळेस कारवाई केली. त्यानंतर ही परिस्थिती जैसे थे आहे.

- खर्च २ कोटी ५० लाख ८१ हजार- रस्त्याची लांबी ०.५ किलोमीटर- रस्त्याची रुंदी ७ मीटर

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा