शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांनी घेतली वानराची धास्ती

By admin | Updated: August 27, 2014 23:36 IST

मोहन बोराडे, सेलू रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अ‍ॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अ‍ॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत.

मोहन बोराडे, सेलूरेल्वेस्थानक परिसरात एक वानर अ‍ॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अ‍ॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत. बुधवारी त्यांनी पोलिस स्टेशन गाठून ‘त्या’ वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांना केली आहे़ रेल्वे स्टेशन परिसरात नर जातीचे सुदृढ वानर मागील पंधरा दिवसांपासून आॅटोचालकांचा पिच्छा पुरवत आहे़ या वानराने आॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास थापडाने मारहाण व चावा घेण्याचा सपाटा लावला आहे़ विशेष म्हणजे केवळ अ‍ॅटो सुरू असतानाच हे वानर आॅटोचालकांवर तुटून पडत आहे़ इतर अ‍ॅटोतील प्रवाशांना मात्र ते काहीही इजा करत नाही़ त्यामुळे आॅटोचालक या परिसरात अ‍ॅटो चालविण्यास धजावत नाहीत़ रेल्वे स्टेशन परिसरात आॅटोचालक भाऊ मुकणे यांना या वानराने तीन वेळा अ‍ॅटोचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला चढविला तर एक वेळा खांद्याला चावा घेतला़ तर अन्य एका आॅटोचालकाला आदर्शनगर परिसरात ‘त्या’ वानराने गाठून मांडीचा चावा घेतला़ तर फुलेनगर परिसरात बुधवारी सकाळी माणिक कुरे या आॅटोचालकाला या वानराने मारहाण केली़ चालत्या आॅटोमध्ये अचानक वानराने झडप मारल्यामुळे आॅटोचालकाचे नियंत्रन सुटले व आॅटो रस्त्यावर उलटला़ सुदैवाने या आॅटोरिक्षात प्रवाशी नव्हते़ सदरील वानराच्या प्रतापामुळे आॅटोचालक हैराण झाले. त्यामुळे त्यांनी बुधवारी सकाळी आॅटोसह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेवून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबूराव राठोड यांच्याकडे वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली़ पंधरा दिवसापासून रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात आॅटोचालकांचा पाठलाग करून हे वानर त्यांच्यावर हल्ला चढवित आहे़ त्यामुळे आॅटोचालक भयभीत झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़