रिक्षाचालक सरसावले स्वच्छतेसाठी

By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:48:28+5:302014-06-08T00:56:49+5:30

जालना :येथील बसस्थानक परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.

Rickshaw drivers have cleaned up | रिक्षाचालक सरसावले स्वच्छतेसाठी

रिक्षाचालक सरसावले स्वच्छतेसाठी

जालना :येथील बसस्थानक परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवासी व सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या परिसरातील हॉटेलचालक, दुकानदारांसह पालिकेतील सफाई कामगार याच परिसरात कचरा व घाण आणून टाकतात. प्रवासी बसस्थानकाच्या आवारातच उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पार्कींगची सुविधा नसल्यामुळे रिक्षा चालकही बाहेर पार्किंग करत आहेत. त्यामुळे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
या परिसरातील घाण तात्काळ साफ करण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको, उपोषण, रिक्षा बंद अशाप्रकारे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक दिलीप सावजी, अन्वर, शकील, वसीम, अशोक म्हस्के, आहेर मामा, कदम, उस्मान, माऊली, सुभाष, जावेद, अहेमद, फारूख चाऊस, झिया, राधाकिशन, मच्छिंद्र खरात व परिसरातील रिक्षाचालकांच्या वतीने देण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
पालिकेला निवेदन
बसस्थानकासह शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराची स्वच्छता करावी, या मागणीसाठी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Rickshaw drivers have cleaned up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.