शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मागोवा २०१७ : औरंगाबाद शहरात घडले पहिले हृदय अन् यकृत प्रत्यारोपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:54 IST

२०१७ हे सरते वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरले. याच वर्षात मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण, पहिले यकृत प्रत्यारोपण झाले आणि वैद्यकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिले गेले.

ठळक मुद्दे याच वर्षात मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण, पहिले यकृत प्रत्यारोपण झाले प्रसूतीशास्त्र विभागात पैशांसाठी छळ छावणीत गॅस्ट्रोचा उद्रेक सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेची प्रतीक्षाच

-संतोष हिरेमठ

औरंगाबाद : २०१७ हे सरते वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरले. याच वर्षात मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण, पहिले यकृत प्रत्यारोपण झाले आणि वैद्यकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिले गेले. या सकारात्मक घटनांबरोबर घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागातील महिला कर्मचार्‍यांकडून पैशांसाठी नातेवाईकांचा होणारा छळ, छावणीतील गॅस्ट्रोचा उद्रेक आणि लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याच्या प्रकरणाने प्रशासन हादरून गेले. दुसरीकडे सरत्या वर्षातही ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णसेवेत दाखल होण्याची नुसती प्रतीक्षा करावी लागली. 

प्रसूतीशास्त्र विभागात पैशांसाठी छळ 

घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात कर्मचार्‍यांकडून होणार्‍या छळामुळे गरोदर मातेस प्रसूतीच्या तर नातेवाईकांना आर्थिक ‘वसुली’च्या कळा सहन कराव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार २०१७ या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आणले. ‘अहो मावशी सांगा ना, मुलगा झाला की मुलगी’ असे विचारत प्रसूती कक्षाकडे डोळे लावून बसलेल्या नातेवाईकांचा कर्मचारी पैशांसाठी नाहक छळ करीत. प्रसूतीसाठी दाखल झाल्यापासून तर प्रसूतीनंतर वॉर्डात दाखल करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नातेवाईकांकडून पैसे उकळले जात. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेतून केलेल्या पाठपुराव्यामुळे याप्रकरणी एका समितीकडून चौकशी झाली आणि कर्मचार्‍यांच्या अन्य वॉर्डात बदल्या करण्यात आल्या.

फेब्रुवारीत हृदयप्रत्यारोपण

जानेवारी २०१६ मध्ये मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ सुरू करणार्‍या औरंगाबाद शहराने हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून वैद्यकीय इतिहासात २०१७ मध्ये आणखी एक नवा अध्याय लिहिला. दुचाकीच्या अपघातात ब्रेन डेड झालेल्या शिक्षकाचे हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत (लिव्हर) या अवयवाचे दान करण्यात आले. त्यातून १ फेब्रुवारी रोजी प्रथमच मराठवाड्यात हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. 

यकृत प्रत्यारोपणाची लढाई जिंकली

मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी २५ नोव्हेंबरला यकृत प्रत्यारोपणाची लढाई जिंकत वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने एक नवीन पाऊल टाकले. ब्रेन डेड रुग्णाच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अन् मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण औरंगाबादेत पार पडले. किडनी, हृदयासह आता यकृत प्रत्यारोपणही शहरात शक्य झाले.

छावणीत गॅस्ट्रोचा उद्रेक 

छावणी परिसरातील २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे ११ नोव्हेंबर रोजी समोर आले. यानंतर अवघ्या दहा दिवसांत गॅॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ६ हजारांवर पोहोचल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. गॅस्ट्रोच्या या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली. गॅस्ट्रोच्या उद्रेकाप्रकरणी दोषींवर करवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची चौकशी रेंगाळली. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाठपुरावा केला आणि अखेर २१ डिसेंबरला चौकशी पूर्ण झाली.

सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेची प्रतीक्षाच

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सरत्या वर्षातही रुग्णसेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागली. रुग्णालयाचे २०१२ मध्ये काम सुरू झाले. दीड वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात हे काम होण्यास पाच वर्षे लागले. हे रुग्णालय ३० नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. सार्वजनिक विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचा ताबाही घेतला, तरीही न्यायालयाने दिलेली डेडलाइन हुकली. यानंतरही रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यासाठी क ोणत्याही प्रकारे गती मिळाली नाही. आता नव्या वर्षातच हे रुग्णाल सुरू होणार असल्याचे दिसते.

लाखोंची औषधी कालबाह्य

जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे ‘लोकमत’ने २१ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून उघडकीस आणताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने औषधी कालबाह्य झाल्याचा हा प्रकार उघडकीस आणला असून, दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली. याप्रकरणी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने चौकशी समिती नेमून झालेले नुकसान दोषींकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला.

अनेक घटनांनी वेधले लक्ष

वर्षभरात घाटी रुग्णालयात अनेक घटनांनी लक्ष वेधले. घाटी रुग्णालयातील निवासस्थानातील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याप्रकरणी एका समितीची स्थापना करून कारवाई करण्यात आली. मराठवाड्यासह लगतच्या भागासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या घाटी रुग्णालयात जवळपास ५० औषधी पुरवठादारांचे ९.२४ कोटी रुपये थकल्याने अनेक औषधांचा पुरवठा ठप्प झाल्याने वर्षभरात वेळोवेळी औषधांचा तुटवडा निर्माण झाला. नव्याने बांधण्यात आलेले मध्यवर्ती ग्रंथालय आणि वसतिगृह फर्निचरअभावी यंदाच्या वर्षीही सुरू होऊ शकले नाही.

महाविद्यालयात एमडी- वार्धक्य वैद्यकशास्त्र (जेरियाट्रिक्स) विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून, पुढील वर्षापासून तीन जागांसाठी प्रवेश प्रक्रि या सुरू होईल. तसेच बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा रेडिओथेरपीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी २९ कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. या निधीतून २७ प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामग्रींची खरेदी होईल.  शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण, बांधकाम विस्तारीकरण, फर्निचर आदींसाठी २० कोटींच्या निधीची प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी