शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे महसूल ठप्प

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

हिंगोली : आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कामकाज ठप्प झाले असून सर्वत्रच कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता.

हिंगोली : आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कामकाज ठप्प झाले असून सर्वत्रच कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणीही उपस्थित दिसत नव्हते. आलेले कर्मचारीही कार्यालयाबाहेरच रेंगाळत असल्याचे चित्र दिसले.जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात हिंगोलीमध्ये सारखेच चित्र होते. जिल्ह्यातील जवळपास २४३ कर्मचारी संपावर गेलेले आहेत. यामध्ये लिपिक, अव्वल कारकुन तसेच लिपिक संवर्गातून पदोन्नत नायब तहसीलदारांचा समावेश आहे.संपामुळे कामकाज ठप्प असले तरी अनेकांना याबाबत माहिती नसल्याने जिल्हा कचेरीत आल्यानंतर अशांचा हिरमोड होत होता. कोणतेही काम तर होत नव्हते मात्र कामाबाबत माहिती विचारायलाही कोणी हजर नसल्याने अनेकजण त्रागा व्यक्त करून आल्या पावली परत गेले. कळमनुरीतही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले. (जिल्हा प्रतिनिधी)वसमतमध्ये हेलपाटेवसमत येथेही संपामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागले. मात्र तहसीलदार अरविंद नरसीकर हे ठाण मांडून होते. त्यांनी मात्र जमेल तेवढ्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.औंढ्यात जिल्हाधिकारीऔंढा नागनाथ येथे तहसीलदार श्याम मदनूरकर व नायब तहसीलदार राजेश लांडगे हजर होते. कर्मचारी नसले तरी जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी सायंकाळी ५ वा. येथे वनविभागाला भेट दिली.सेनगाव, हिंगोलीतही तेचसेनगाव व हिंगोली तहसील कार्यालयातही अशीच परिस्थिती असली तरी हिंगोलीत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी कार्यालयीन कामे हाती घेतली होती. मात्र कर्मचारी दिसत नव्हते.अधिकाऱ्यांचे हातावर हातकार्यालयात कर्मचारी नसले तरी अधिकारी मात्र हजर होते. परंतु कर्मचारीच नसल्याने त्यांना शक्य तेवढी कामे करता आली. निवेदने स्वीकारणे व आवश्यक तेवढी शासन आदेशाच्या तत्काळ अंमलबजावणीची कामे केली जात होती.जिल्हाधिकाऱ्यांचा संपाशीच सामनानूतन जिल्हाधिकारी टी.जी. कासार हे रुजू झाले आणि कर्मचाऱ्यांचाही त्याच दिवशी संप सुरू झाला. त्यामुळे त्यांनाही नियमित कामानिमित्ताने अडचणीचा सामना करावा लागला.