महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 24, 2014 01:37 IST2014-05-24T01:29:44+5:302014-05-24T01:37:22+5:30

लातूर : निवडणुकीची आचारसंहिता शिथील होताच लातूर जिल्ह्यातील महसुली कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या व पदोन्नत्या झाल्या आहेत.

Revenue Managers Transfers | महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या

महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या

लातूर : निवडणुकीची आचारसंहिता शिथील होताच लातूर जिल्ह्यातील महसुली कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या व पदोन्नत्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी २० मे रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपीक, वाहनचालक आदी संवर्गातील नियतकालीन व विनंतीवरूनच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अव्वल कारकून संवर्गात ज्ञानेश्वर पेंढारकर, सुरेश पाटील, डी.पी. पवळे, एल.व्ही. दासरे, श्रीमती माडजे, श्रीमती हंबिरे यांच्या विनंतीवरून बदल्या झाल्या. तर एस.एम. माडजे, ए.एस. खाडे, जी.जी. कुलकर्णी, आर.जी. काळे, व्ही.डी. धायगुडे, श्रीमती कलशेट्टी, एम.ए. ढोक यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या झाल्या. अव्वल कारकून संवर्गात गणेश विडेगोटी, एस.पी. जाधव, श्रीमती डांगे, डी.एन. हारणे, हरिभाऊ नाईक, एस.बी. कवळीकर, लालासाहेब देशपांडे, दीपक भुजबळ, ओ.बी. दंडे, एस.जी. सोनकांबळे यांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या देऊन बदली व पदस्थापनेचे आदेश देण्यात आले आहेत. मंडळ अधिकारी संवर्गात यु.डी. सिरसाट, आर.के. कराड, एम.व्ही. शृंगारे, ई.जी. ऐतलवाड, एम.ए. मुजावर, आर.डी. धुमाळ, एन.ए. शेख, आर.एस. मिरजगावकर, एल.पी. कांबळे, डी.एस. कºहाळे, डी.एस. मजगे, बी.के. भालेराव, बी.एस. सदानंदे, ए.आर. जगताप, के.एस. घोडके, बी.एम. चिंचोलकर यांच्या विनंतीवरून बदल्या झाल्या. तसेच मंडळ अधिकारी संवर्गात अनिता ढगे, गणेश हिवरे, उद्धव जाधव, शिरीष देवर्षे, तात्याराम सुरवसे, संजय कुलकर्णी, स्वाती कवळीकर यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन पदस्थापनेचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Revenue Managers Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.