महसूल कार्यालयातील लिपिकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 9, 2015 00:54 IST2015-05-09T00:48:12+5:302015-05-09T00:54:28+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाअंतर्गत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील ३२ लिपिकांच्या गुरूवारी बदल्याचे आदेश देण्यात आले आहेत़

Revenue Department Transcripts Transcripts | महसूल कार्यालयातील लिपिकांच्या बदल्या

महसूल कार्यालयातील लिपिकांच्या बदल्या


लातूर : लातूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाअंतर्गत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील ३२ लिपिकांच्या गुरूवारी बदल्याचे आदेश देण्यात आले आहेत़ बदली झालेल्या कर्मचाऱ्यानी तात्काळ रुजू होण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले आहे़ कर्मचारी तात्काळ रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे़
लातूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनात लिपीक पदावर कार्यरत असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील विभागातील ३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदली झालेल्या लिपिकांनी तात्काळ रुजू होण्याच्या आदेश ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ या ३२ बदल्यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी विश्वभंर गावंडे यांनी या बदल्या दैनंदिन प्रशासकीय कामाचा भाग असून तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या कर्मचाऱ्यांना ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे़ अथवा ज्या कर्मचाऱ्याच्या तक्रारी आल्या आहेत अशा तक्रारीची दखल म्हणून कांहीजणांच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगीतले आहे़

Web Title: Revenue Department Transcripts Transcripts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.