महसूल आयुक्तालय लातूरलाच हवे !
By Admin | Updated: January 7, 2015 01:01 IST2015-01-07T00:55:07+5:302015-01-07T01:01:03+5:30
लातूर : आयुक्तालयासाठी मध्यवर्ती ठिकाण लातूर असून, गुणवत्तेच्या दृष्टीनेही लातूरच सरस आहे़ त्यामुळे नवीन आयुक्तालय नांदेड, परभणी ऐवजी लातुरातच व्हावे,

महसूल आयुक्तालय लातूरलाच हवे !
लातूर : आयुक्तालयासाठी मध्यवर्ती ठिकाण लातूर असून, गुणवत्तेच्या दृष्टीनेही लातूरच सरस आहे़ त्यामुळे नवीन आयुक्तालय नांदेड, परभणी ऐवजी लातुरातच व्हावे, अशी अपेक्षा ९३ टक्के लोकांनी व्यक्त केली आहे़ भौगोलिक दृष्ट्या आणि विभागीय कार्यालयांची संख्या लक्षात घेता आयुक्तालय लातूरला झाले पाहिजे, असे मत सर्व्हेक्षणात लातूरकरांनी व्यक्त केले आहे़ आयुक्तालयासाठी भव्य इमारत तयार असून, वेगवेगळी २७ विभागीय कार्यालये कार्यान्वित आहेत़ आयुक्तालयाच्या दृष्टीने लातूरकडेच गुणवत्ता आहे़ त्यामुळे शासनाने काढलेली अधिसूचना महसूल नियमांच्या विसंगत आहे, अशी मते ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात लातूरकरांनी व्यक्त केली आहेत़