महसूल व पोलिसांत वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यावरून सुंदोपसंदी
By Admin | Updated: March 21, 2016 00:13 IST2016-03-20T23:57:16+5:302016-03-21T00:13:44+5:30
परतूर : वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यावरून पोलिस व महसूल विभागात सुंदोपसंदी सुरू असून, अखेर मंडळ अधकाऱ्यांची फिर्याद डावलून पोलिसांच्या

महसूल व पोलिसांत वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यावरून सुंदोपसंदी
परतूर : वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यावरून पोलिस व महसूल विभागात सुंदोपसंदी सुरू असून, अखेर मंडळ अधकाऱ्यांची फिर्याद डावलून पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करण्यात आले.
तालुक्यातील दुधना व गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. पोलिसांनी अशी चारपाच वाहने पकडली आहेत. या वाहनांना महसूलने दंड आकारायचा की, पोलिसांनी गुन्हा दाखल करायचा, की दोन्ही कारवाया करायच्या याबाबत चार ते पाच दिवसांपासून खल सुरू आहे.
यामध्ये बराच गोंधळही उडत आहे. १९ मार्च रोजी रात्री महसूलचे मंडळ अधिकारी वरफळकर हे एका वाळूच्या ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले असता, ठाण्यात उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी इतर पकडलेल्या चार वाहनांच्या अहवालाबाबत विचारणा केली असता वरफळकर म्हणाले, ३ जणांनी दंड भरला आहे.
एका जवळ टोकन सापडले. त्यामुळे एका वाहनाची फिर्याद देण्यासाठी आलो आहे. यावर या ठिकाणी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी ही फिर्याद नाकारून पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून यातील दोन ट्रॅक्टरवर रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. एकूणच वाढत्या उन्हाबरोबरच दुधना व गोदवरीची वाळूही तापू लागली आहे. पोलिस व महसूल यांच्यातही कारवाई वरून खटके उडत आहेत. (वार्ताहर)