निवृत्त पोलीस उपअधीक्षकाच्या मुलाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST2020-12-29T04:06:06+5:302020-12-29T04:06:06+5:30
सोनू पाठक आणि ललीत पाठक (दोघे रा. शांतीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. छावणी पोलिसांनी सांगितले की, हेमंत दौलत मोरे ...

निवृत्त पोलीस उपअधीक्षकाच्या मुलाला मारहाण
सोनू पाठक आणि ललीत पाठक (दोघे रा. शांतीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. छावणी पोलिसांनी सांगितले की, हेमंत दौलत मोरे यांचे शांतीपुरा परिसरात हॉटेल आहे. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हेमंत हे हॉटेलमध्ये बसले असताना तिथे तेथे आले. आम्हाला हॉटेलमध्ये रुम का देत नाही, आम्ही पैसे देत नाही का? असे म्हणून त्यांनी हेमंतशी वाद घातला. यावेळी झालेल्या भांडणात आरोपींनी हेमंत यांच्या खिशातील २ हजार रुपये काढून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी तपास सुरू केला आहे.
==================
दुचाकीने उडविले
औरंगाबाद : भरधाव दुचाकीस्वाराने पादचारी नवनाथ काळे यांना जोराची धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत. ही घटना २५ डिसेंबर रोजी सिडको एन-७ मधील व्यंकटेश सोसायटीत घडली. याप्रकरणी कृष्णा काळे यांनी सिडको ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
=======================
प्रिया कॉलनीत मोटारसायकल जाळली
औरंगाबाद : सिडको आंबेडकरनगर येथे समाजकंटकाने तबेला पेटवून घोडा मारल्याची घटना ताजी असताना पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनी येथे घरासमोर उभी मोटारसायकल (एम. एच. २० एफ. एल. ०३७०) अज्ञाताने जाळली. २७ डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी समीर मुक्तार शेख यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.
===================
किरकोळ कारणावरून चाकूहल्ला
औरंगाबाद : वहिनीला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या सचिन सुरेश पगारे (वय ३१) त्यांच्यावर दीपक मुरलीधर काकडे याने चाकूहल्ला केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी रात्री मिलिंदनगर, उस्मानपुरा येथे घडली. याविषयी सचिन यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.