विश्वस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:31+5:302021-04-09T04:05:31+5:30
औरंगाबाद : विश्व मराठी अध्यापक परिषदेच्यावतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रथम क्रमांक ...

विश्वस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल
औरंगाबाद : विश्व मराठी अध्यापक परिषदेच्यावतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रथम क्रमांक अकोला येथील जुही वानखेडे, दि्वतीय क्रमांक सांगली येथील सुनील तोरणे, तर तृतीय क्रमांक अमरावती येथील नितीन देशमुख याने पटकावला आहे.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. ललित अधाने व सचिव डॉ. कैलास अंभुरे यांनी कळविले आहे की, देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून, तसेच नवीन पिढीतील कवींना या विषयावर लिहिते करावे, यासाठी मार्च महिन्यात ‘शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदा’ या विषयावर ही काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम आलेल्या जुही वानखेडे यांना रोख १० हजार रुपये व प्रशस्तीपत्र, दि्वतीय क्रमांक पटकाविलेल्या सुनील तोरणे यांना रोख ७ हजार रुपये व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या नितीन देशमुख यांना रोख ५ हजार रुपये व प्रशस्तीपत्र, तर उत्तेजनार्थ आलेल्या सपना सोनवणे (नाशिक), सुजित फलके (औरंगाबाद), हर्षदा गायकवाड (औरंगाबाद) आणि डॉ. सी. जे. थिरुपूरसुंदरी (बंगळूरू) यांना प्रत्येकी रोख ५०० रुपये व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कवी भास्कर निर्मळ पाटील व समीक्षक डॉ. समिता जाधव यांनी काम पाहिले. या पारितोषिकांचे वितरण परिषदेच्या उद्घाटन समारंभात केले जाणार आहे.