शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

निकाल रखडले, ‘एम.फिल.’ची प्रवेश प्रक्रिया अडचणीत; विद्यापीठाचे संपूर्ण नियोजनच कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:24 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एम.फिल. अभ्यासक्रमासाठी २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सीईटी घेतली.

ठळक मुद्देप्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी ९ डिसेंबरला घोषित होणारदोन डिसेंबरपर्यंत करता येईल नोंदणी

औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणखी किमान दहा दिवस तरी विद्यापीठात येऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा सुस्तावली आहे. दिवाळीपूर्वी जाहीर होणारे बहुतांश पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. एम.फिल.ची प्रवेशपूर्व परीक्षा झाली. मात्र, पदव्युत्तर विभागाच्या निकालाअभावी ही प्रवेश प्रक्रियाही आता लांबणीवर पडली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एम.फिल. अभ्यासक्रमासाठी २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सीईटी घेतली. दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबरला सीईटीचा निकाल जाहीर झाला. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालाअभावी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. दुसरीकडे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी एम.फिल. प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून अनेकांनी ऑनलाइन अर्जावर ‘एसईबीसी’ प्रवर्ग नमूद केला होता. मात्र, राज्य शासनाने या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ ऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातून प्रवेशाचा लाभ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे अगोदर ऑनलाइन अर्जात नमूद प्रवर्गात दुरुस्ती करणे व प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला आहे. 

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एम.फिल. प्रक्रियेसंदर्भात बैठक झाली. त्या बैठकीत ‘एसईबीसी’ प्रवर्गातील अनेकांनी आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मागितली. दुसरीकडे, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अनेक विषयांच्या निकालास विलंब झाला आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण ऑनलाइन नोंद करण्यासाठी तसेच ‘ईडबल्यूएस’ प्रवर्गात नोंद करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

दोन डिसेंबरपर्यंत करता येईल नोंदणीनव्या वेळापत्रकानुसार २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल. दुसऱ्या दिवशी गुणवत्ता यादी घोषित करण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी ९ डिसेंबरला घोषित होणार असून, १८ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर तासिका सुरू करण्याचा पदव्युत्तर विभागाचा विचार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद