‘रेसीपी शो’ला सखींचा भरभरून प्रतिसाद
By Admin | Updated: June 11, 2014 00:24 IST2014-06-11T00:11:05+5:302014-06-11T00:24:36+5:30
‘फूड फॉर मूड’ कार्यक्रम: सखींना मिळाला नवनवीन पदार्थ घरीच तयार करण्याचा सल्ला
‘रेसीपी शो’ला सखींचा भरभरून प्रतिसाद
हिंगोली : महिलांच्या आवडीचा आणि नित्यनेमाने कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकाशी निगडित घेतलेल्या ‘रेसीपी शो’ला सखींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. स्वंयपाकातील बारीकसारीक बाबींची माहिती जाणून घेत सखींनी नवनवीन पदार्थ अवगत करून घेतले. सोबतच शेफ समीर दामले यांनी केलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला.
‘लोकमत’ सखीमंचच्या वतीने हिंगोली शहरातील नाईकनगर भागातील राष्ट्रवादी भवन येथे ७ जून रोजी ‘फूड फॉर मूड’अंतर्गत रेसीपी शो (कुकरी) घेण्यात आला. उद्घाटन लीना दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून लावण्य ब्यूटी पार्लरच्या लीना जाधव, संतोष जाधव, युवराज फॅशन ज्वेलर्सचे केशव शांकट, लता शांकट, हिंगोली अर्बनचे जयेश खर्जुले, रोहिणी खर्जुले, अश्विनी महालनकर उपस्थित होत्या. खास सखींसाठी घेतलेल्या या कार्यक्रमात स्वयंपाकातील काही उणिवा दूर करण्याची माहिती महिलांनी जाणून घेतली. त्यानुरूप शेफ समीर दामले यांनी आजघडीला बाजारात लोकप्रिय असलेल्या फूडबद्दल सविस्तर माहिती दिली. तद्नंतर हे फूड घरीच तयार करण्याचे प्रशिक्षणही दामले यांनी महिलांना दिले. त्यावेळी काही सखींनी फूड संदर्भात विचारलेल्या प्रश्नाची महिती दामले यांनी दिली. दरम्यान, दामले यांनी झटपट केलेल्या विविध पदार्थांचा अस्वाद बहुतांश सखींनी घेतला. धावपळीच्या काळात घरातील अन्न अधिक काळ टिकून ठेवण्याचे उपयुक्त फॉर्म्युला दामले यांनी सखींना दिला. स्वयंपाकाबाबत दिलेल्या सल्ल्यामुळे या कार्यक्रमास सखींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठ्या संखने सदस्या या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रजनी पाटील यांनी केले. प्रायोजकत्व युवराज फॅशन ज्वेलर्स, लावण्य ब्युटी पार्लर आणि हिंगोली अर्बन यांनी स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
वसमत येथील कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण
वसमत शहरातील हॉटेल व्यंकटेश्वरा येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्योतीताई जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बचपन अप्ले स्कूलचे व्यवस्थापक प्रा. एफ.एफ. कच्छी, गजाननबाबा वस्त्रभांडारचे महेश दलाल, शिल्पा दलाल, नगसेवक नवीनकुमार चौकडा उपस्थित होते. कार्यक्रमात येथील गजाननबाबा वस्त्रभांडारच्या वतीने ठेवलेल्या लकी ड्रॉच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यात शहरातील विजेत्या सदस्या विद्या कदम, राणी पातेकर, अनुजा डिगुळकर, संगीता माळवटकर, रेविता कावळे, जयश्री बेंडके, वैशाली राखोंडे, रूपाली सिरसकर, पूनम अग्रवाल, इंदू मसलेकर यांना ‘उपाडा साड्या’ पारितोषिक म्हणून देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व बचपन अप्ले स्कूलने स्वीकारले होते.