आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:33+5:302021-09-23T04:06:33+5:30
शिऊर : जे. के. जाधव मित्रमंडळाच्या वतीने, जीवन विकास महाविद्यालयात मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ...

आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
शिऊर : जे. के. जाधव मित्रमंडळाच्या वतीने, जीवन विकास महाविद्यालयात मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. या हेतूने जे. के. जाधव मित्रमंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा, जे. जे. हॉस्पिटल औरंगाबाद, हेमंत त्रिवेदी यांचे बॉडी मास इंडेक्स, आनंद हॉस्पिटल वैजापूर, सोमवंशी डेंटल हॉस्पिटल वैजापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी झाली होती. श्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक्षा चुडीवाल, डॉ. नवनाथ सोनवणे यांनीदेखील सहभाग नोंदवून रुग्णांची तपासणी केली. ६५५ जणांची तपासणी करण्यात आली. ३५ रुग्णांवर डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिऊरचे भूमिपुत्र जे. के. जाधव यांनी यापूर्वी अनेक आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात यशस्वीपणे घेऊन गरजूंना त्याचा लाभ मिळवून दिला. कोरोनामुळे दोन वर्षे शिबिर घेता आले नाही. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने अनेकांना दिलासा मिळाला.