लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरला प्रतिसाद
By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-31T00:03:16+5:302014-05-31T00:29:19+5:30
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़
लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरला प्रतिसाद
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे आहेत. ३० मे ते १ जून दरम्यान भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन लाभत आहे़ महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूटची माहिती येथे देण्यात येत आहे़ ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, श्री गुरु गोविंदसिंघ बी़ जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णूपुरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरिग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट पुणे, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा जि़ हिंगोली आदींच्या स्टॉल्सवर माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी- पालकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले़ तसेच सेमिनारही घेण्यात आले होते़ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी तोंडभरुन कौतुक केले़ त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही या प्रदर्शनाला भेट देवून समाधान व्यक्त केले़ (वाणिज्य प्रतिनिधी) लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरचा आज उद्घाटन सोहळा लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ चा मुख्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री डी़पी़सावंत, कुलगुरु डॉ़पंडित विद्यासागर यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार आहे़ एज्युकेशन फेअरचे दालन शुक्रवारपासूनच सुरु झाले असून या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी भेट दिली़ आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजता एज्युकेशन फेअरचा मुख्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री डी़पी़सावंत यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़पंडित विद्यासागर हे राहणार आहेत़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे़ आजचे सेमिनार ‘करिअर इन अॅनिमेशन’ वेळ- सायंकाळी ६ वाजता, वक्ते- संतोष रासकर, सृजन अॅनिमेशन, पुणे ‘१२ वी नंतरचे करिअर आणि जीवनाचा अर्थ समजून सांगणारे शिक्षण’ वेळ- रात्री ७ वाजता, वक्ते- प्रो़ नितीन नाईक, पुणे