आरक्षित वॉर्डांत जखडली चळवळ

By Admin | Updated: November 8, 2016 00:03 IST2016-11-08T00:05:15+5:302016-11-08T00:03:26+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीसाठी २६ जागा आरक्षित आहेत.

Reserved movement in reserved wards | आरक्षित वॉर्डांत जखडली चळवळ

आरक्षित वॉर्डांत जखडली चळवळ

विशाल सोनटक्के उस्मानाबाद
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीसाठी २६ जागा आरक्षित आहेत. या २६ वॉर्डांबरोबरच अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक असलेल्या काही ठराविक वॉर्डांमध्ये एकूणच चळवळ जखडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऐनवेळी इतर पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतल्याचे जिल्हाभरातील चित्र आहे.
उस्मानाबाद नगर पालिकेत आरक्षित असलेल्या प्रभाग १ (अ) मध्ये तब्बल दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे प्रमुख राजकीय पक्षाबरोबरच काही अपक्षही रिंगणात असल्याने चुरशीचा सामना होवू शकतो. प्रभाग क्र. ३ (अ) मध्ये अवघे तीन उमेदवार रिंगणात असून, सध्यातरी या एकमेव मतदारसंघात सेना-भाजपाची युती झाली आहे. प्रभाग १४ (अ) मध्ये दहा उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. या आरक्षित वॉर्डाबरोबरच प्रभाग क्र. १४ (ब) या खुल्या वॉर्डात विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आमने-सामने ठाकल्याचे चित्र आहे. येथून रिपाइंचे राजा ओव्हाळ, काँग्रेसचे सिध्दार्थ बनसोडे, भाजपाकडून विशाल शिंगाडे यांच्यासह प्रज्ञावंत ओव्हाळ, पृथ्वीराज चिलवंत, किशोर बनसोडे, कल्याण माळाळे आणि मैनुद्दीन पठाण आदींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रभाग क्र. ७ (अ) मध्ये ८ तर प्रभाग क्र. १३ (अ) मध्ये तब्बल बारा उमेदवार मैदानात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. १४ (अ) मध्येही उमेदवारांची अशीच भाऊगर्दी झाल्याचे चित्र असून, येथूनही दहा जणींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऐन वेळी पक्ष बदलल्याचेही दिसून येते.
नळदुर्ग पालिकेत राखीव असलेल्या प्रभाग २ मध्ये काँग्रेसकडून राखी बनसोडे आणि राष्ट्रवादीकडून भारती बनसोडे या नवख्या उमेदवारांत सामना रंगणार आहे. तर प्रभाग ८ मधून काँग्रेसतर्फे मारूती खारवे, राष्ट्रवादीकडून दयानंद बनसोडे, प्रभाग ८ (अ) मधून योगेश बनसोडे आणि सचिन बनसोडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कळंब पालिकेत प्रभाग क्र. ३ (अ) मध्ये माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांच्या पत्नी सुनंदा गायकवाड काँग्रेसकडून तर माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल यांच्या भावजय इंदूमती हौसलमल या राष्ट्रवादीकडून आमने-सामने ठाकल्या आहेत. प्रभाग क्र. ६ मध्येही असाच चुरशीचा सामना रंगणार आहे. आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते मच्छिंद्र गायकवाड यांच्या कन्या सरला सरवदे या राष्ट्रवादीकडून तर शिवाजी सिरसट यांच्या पत्नी मीनाक्षी या काँग्रेसकडून नशीब आजमावणार आहेत. मच्छिंद्र गायकवाड यांचे सुपुत्र लखन यांनी प्रभाग क्र. ४ (अ) मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, रिपाइंचे नेते मुकुंद साखरेही याच प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.
तुळजापूर नगर पालिकेमध्ये प्रभाग क्र.२ मध्ये चुरशीची लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाइं आघाडीतर्फे वैशाली तानाजी कदम, काँग्रेस-भाजपा आघाडीकडून अप्सरा बाळासाहेब कदम यांच्यात चुरस असून, लक्ष्मी महेश कदम आणि किमया प्रताप कदम या अपक्ष उमेदवारांचाही अर्ज आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-रिपाइं आघाडीकडून किशोर बाबूराव साठे तर काँग्रेस-भाजपा आघाडीकडून अनुक्रमे शंकर महादू शिंदे आणि दीपक बाबूराव खंदारे यांचे अर्ज आहेत. शिवसेनेकडून स्वरूप अभिमान कांबळे आणि अपक्ष म्हणून महेंद्र तुळशीराम कदमही रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये चुरशीचा दुरंगी सामना अपेक्षित असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-रिपाइं आघाडीकडून हेमा औदुंबर कदम, काँग्रेस-भाजपा आघाडीकडून सुनीता अविनाश रसाळ आणि संगिता विलास कदम यांच्यासह संपतबाई सुभाष कदम यांची उमेदवारी असून, किमया प्रताप कदम या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

Web Title: Reserved movement in reserved wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.