शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

२१ जुलै रोजी आरक्षण सोडत

By admin | Updated: July 20, 2014 00:27 IST

कंधार : आगामी पं़स़ सभापती पदाची आरक्षण सोडत २१ जुलै रोजी होणार आहे़ परंतु पं़स़ सदस्यांत कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़

कंधार : आगामी पं़स़ सभापती पदाची आरक्षण सोडत २१ जुलै रोजी होणार आहे़ परंतु पं़स़ सदस्यांत कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षात कुरघोडीचे राजकारण होण्याचे संकेत आहेत़ त्यातच शेकापची भूमिका मात्र निर्णायक राहणार असेच एकंदरीत राजकीय चित्र आहे़त्रिस्ततरीय पंचायतराज व्यवस्थेमुळे पंचायत समिती गठीत करण्यात आली़ सुरुवातीला सभापती, उपसभापती, पं़स़ सदस्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते़ कंधार पंचायत समितीचे सभापती म्हणून पहिला बहुमान सप्टेंबर १९६२ मध्ये विठ्ठलराव गणपतराव पवार यांना मिळाला़ त्यानंतर भाई गुरुनाथराव माणिकराव कुरुडे, प्रल्हाद केशटवार, शंकरराव जाधव, व्यंकटराव मुकदम, माधवराव पांडागळे यांनी सभापतीपद भूषविले़ १९९७ पासून आरक्षण लागू झाले़ त्यामुळे आरक्षणाचा पहिला सभापतीपदाचा मान भारतबाई व्यंकटराव गायकवाड यांना मिळाला़ त्यानंतर बापूराव गौंड, कालीदास गंगावरे, माणिक चोपवाड, बबीता कदम, रामचंद्र राठोड यांनी सभापतीपद भूषविले़मार्च २०१२ मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सभापती पदाचे आरक्षण होते़ शह-काटशहाच्या राजकारणामुळे पंकजा केंद्रे यांना संधी मिळाली़ आपल्या कार्यकाळात त्यांनी पक्ष मजबुती व पक्षवाढीसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी किती तत्परता दाखविली याचा लेखाजोखा पक्षाकडे असेल़ कोणत्या प्रवर्गाला आरक्षण मिहणार यावरून मोठे अंदाज व्यक्त केले जात आहेत़ परंतु सध्याची काँग्रेस-राकाँ व शेकाप आघाडी राहणार का, हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे़ मागील वेळेस कोणतेही पद शेकापला मिळाले नाही़ त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाला आरक्षण सुटल्यास सुनिता कांबळे यांना संधी मिळण्याची आशा आहे़ तसेच अनु़जाती (पुरूष) आरक्षण राहिल्यास राक़ाँ़चे अम्रता कांबळे यांची दावेदारी राहील़ खुल्या पुरुष प्रवर्गातून बालाजी पांडागळेसुद्धा प्रमुख दावेदार राहतील़ सभापती-उपसभापती निवडीत शेकापने मागील वेळी निर्णायक भूमिका बजावली होती़आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शेकापचे अ‍ॅड़मुक्तेश्वरराव धोंडगे व जि़प़ सदस्य प्रा़डॉ़पुरुषोत्तम धोंडगे कोणती भूमिका घेतात, यावर बरेच अवलंबून आहे़ २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण पदाची सोडत होणार आहे़ त्यानंतर राजकीय पक्षात वेगाने चाचपणी करतील़ परंतु सभापती पदाला आगामी विधानसभा निवडणुकीचे संदर्भ मात्र ठळकपणे राहणार हे निश्चित आहे़ (वार्ताहर)आरक्षण सोडतीवरुन राजकारण तापलेविद्यमान पं़स़ सभापती पंकजा केंद्रे या १४ मार्च २०१२ पासून पदभार सांभाळत आहेत़ २०१२ मध्ये काँग्रेस, राकाँ व शेकाप यांनी माजी आ़ प्रताप पा़ चिखलीकर यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी आघाडी केली होती़ त्यामुळे सभापती काँग्रेसचा व उपसभापती राकाँकडे देण्यात आले़ शेकापने राजकीय मन मोठे करत काँग्रेस, राकाँला साथ दिली़ पं़स़मध्ये चिखलीकर समर्थक-५, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस-२ व शेकाप-२ असे पक्षीय बलाबल आहे़ आरक्षण सोडतीवरून राजकारण आताच तापत आहे़