कृषी विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:11+5:302021-09-23T04:06:11+5:30
रोजगार हमी योजना तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र जलसिंचन आयोगाचे सदस्य सु. भी. वराडे ...

कृषी विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे
रोजगार हमी योजना तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र जलसिंचन आयोगाचे सदस्य सु. भी. वराडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण, तत्कालीन आंदोलक विद्यार्थी व परभणीचे माजी जिल्हाधिकारी डाॅ. शाळीग्राम वानखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तत्कालीन आंदोलक द्वारकाभाऊ पाथ्रीकर उपस्थित होते.
यावेळी भुमरे म्हणाले, कृषी आंदोलनातील तेव्हाचे विद्यार्थी आणि नंतर जे कृषी शास्त्रज्ञ झाले त्यांनी अनेक सुधारित वाणाची निर्मिती करून कृषी विकासाला हातभार लावला. पाथ्रीकर म्हणाले, कृषी विद्यापीठ आंदोलनाने मराठवाडा विकास आंदोलनाला प्रेरणा व शिदोरी दिली.
परभणी येथील आंदोलन स्थळावरून माती आणून मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यक्रमस्थळी वृक्षारोपणाची संकल्पना आंदोलक-७२ चे संघटक सतीश देशमुख यांनी यावेळी मांडली. एन. पी. दराडे यांनी सूत्रसंचालन केले.