शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने खंडपीठात औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:17 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर ...

ठळक मुद्देशहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही.

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर जकात नाका व आकाशवाणी चौक व अन्य परिसरात कचरा जाळून टाकणे हेसुद्धा शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे शपथपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखल केले आणि न्यायालयात मनपाचे पितळ उघडे पडले. 

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या समोर याचिकाकर्ते, मनपा व राज्य, केंद्र शासनाच्या वकिलांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला.  महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी महानगरपालिकेचे सर्व दावे फेटाळून लावले.

शहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही. मनपाने जागोजागी खड्डे करून कचरा पुरला आहे. त्याचे सेंद्रिय खत तयार करणार असे सांगितले जात आहे; पण प्रत्यक्षात सर्वकाही अशास्त्रीय पद्धतीने केले जात असल्याचे मंडळाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर कचरा गोळा करण्याची पद्धत, ओला-सुका वर्गीकरण करण्याची पद्धत व साठविलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत सर्व नियमबाह्य असल्याचा दावाही मंडळाने केला. मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी तर  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. उत्तम बोदर तर मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशमुख, अन्य याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही.डी. सपकाळ, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले. आज सुनावणी पावणेदोन तास चालली.

चिकलठाण्यातच कचऱ्यावर होणार प्रक्रिया -मनपामुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आज मनपाच्या वतीने सांगण्यात आले की, चिकलठाणा येथील गट २३१ मधील दुग्धनगरीतील ३ एकर जागेत ओला कचरा व २ एकर जागेत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात सुस्पष्ट शपथपत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी १० एप्रिल रोजी शपथपत्र दाखल करण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी वेळ मागवून घेतला. 

मनपावर प्रशासक, पुढील सुनावणी १० रोजी महानगरपालिका शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे.  यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.  मनपाच्या वतीने अ‍ॅड. जयंत शहा यांनी युक्तिवाद केला. मनपाच्या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. प्रशासक नेमण्यासाठी अ‍ॅड. शहा यांनी शपथपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. कचरा प्रश्न व चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी व मनपावर प्रशासक नेमण्यासंदर्भातील एकत्रित सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोpollutionप्रदूषण