मुलास डांबून ठेवल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 00:20 IST2016-03-21T00:08:35+5:302016-03-21T00:20:01+5:30
नळदुर्ग : अकरा महिन्यांपासून चोवीस वर्षाच्या मुलाचा शोध लागत नसल्याने आईने पोलिसांकडे धाव घेत आपल्या मुलाला डांबून ठेवल्याची फिर्याद रविवारी दाखल केली.

मुलास डांबून ठेवल्याची तक्रार
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अर्धवट असताना टोलची घाई करणाऱ्या सुप्रीम कंपनीने उदगाव आणि जयसिंगपूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीकडे मात्र दुर्लक्षच केले आहे़ चौपदरीकरणामुळे जयसिंगपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचा चार कोटी ८७ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे़ रस्ता रुंदीकरणात सात मीटर डांबरीकरणाचे कारण दाखवून जलवाहिनी न बदलण्याचा घाट घातला जात आहे़ त्याचबरोबर सुमारे ६० वर्षांपूर्वीची उदगावला नळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीही तशीच आहे़ यामुळे जयसिंगपूरकर संताप व्यक्त करीत आहेत. उदगाव (ता़ शिरोळ) येथील कृष्णा नदीवर उदगाव, जयसिंगपूर शहऱ, संभाजीपूर अशा तीन गावांच्या एक लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो़ ही जलवाहिनी सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या रस्त्यालगत आहे़ त्यावरच रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ सध्या नगरपालिका व ग्रामपंचायतीकडून खराब जलवाहिनी बदलण्याचे काम वारंवार सुरू असते़ संभाजीपूर (ता़ शिरोळ) येथे राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाल्याने काम उदगाव येथील कृष्णा नदीपात्रातील पाणी उठाव करून संभाजीपूर येथे आणले जाते. ही जलवाहिनीही महामार्गालगत आहे़ त्यावर रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ उदगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ६० वर्षांपूर्वीची असल्याने तिला वारंवार गळती लागते. त्यामुळे रस्ता खोदून गळती काढावी लागते़ रस्ता रुंदीकरणामुळे कृष्णा नदी ते उदगाव या दोन किलोमीटरच्या अंतरावरील तीन गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खराब होणार आहे़ यामुळे सुप्रीम कंपनीकडून ही जलवाहिनी बाजूला करून रस्ता रुंदीकरण करण्याची गरज होती़ जयसिंगपूर नगरपालिकेने स्वखर्चाने जलवाहिनी स्थलांतरित करून घ्यावी, असे पत्र सुप्रीम कंपनीने पालिकेला दिले होते़ पालिकेच्या सभेत ठराव करून जलवाहिनी बदलाचा खर्च आर्थिकदृष्ट्या न पेलवणारा असल्यामुळे ठेकेदार कंपनीने स्वखर्चाने स्थलांतरित करावीत़, अथवा प्रस्तावित अंदाजपत्रकात यावर विशेष तरतूद करून हा निधी पालिकेकडे वर्ग करावा, अशी मागणी करून शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता़ मात्र, हा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे़ अवजड वाहनांमुळे जलवाहिनीला गळती कृष्णा नदी ते उदगाव गावापर्यंत तिन्ही गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे़ यामुळे वारंवार ग्रामपंचायतीलाही गळती काढण्याचे काम करावे लागत असल्यामुळे आर्थिक भुुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच महामार्गालगत खड्डे पडले आहेत़... हातकणंगले येथून कोल्हापूर-सांगली रोडवर दररोज लहान-मोठी दहा हजारपेक्षा जादा वाहने ये-जा करीत असतात. उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे अर्धवट उभ्या केलेल्या कॉलममुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी होते. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर खड्डे मारून कॉलम उभे केल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी तयार केलेल्या सर्व्हिस रोडमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट व्यावसायिक, नागरिक आणि कर्मचारी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करीत आहेत. पेठनाका ते सांगली हा रस्ता शासनाच्या फंडातून पूर्ण झाला. हा चौपदरी रस्ता तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शासन निधीतून पूर्ण केला. मग सध्याच्या सत्ताधारी शासनामध्ये कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील असताना शिरोली-सांगली रस्त्यावर टोल कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनआंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारासुप्रीम कंपनीने हातकणंगले येथील उड्डाण पुलाचा एक किलोमीटर परिसर वगळून शिरोली-सांगली चौपदरी रस्त्यावर टोल आकारणीस मंजुरी मिळावी, अशी लेखी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे.