शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंची माहिती कळवा; अन्यथा फौजदारी

By admin | Updated: September 17, 2014 01:08 IST

औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व घरमालक, हॉटेल, लॉजमालक आणि संस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंविषयी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे; अन्यथा मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी दिला आहे. अल्प काळासाठी वास्तव्यास येऊन काही व्यक्तींनी घातपात घडविल्याच्या घटना यापूर्वी मुंबई, पुणे या शहरांमध्ये घडलेल्या आहेत. सणासुदीच्या काळात, निवडणुकीच्या काळात बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील व्यक्ती येतात आणि घातपाती कृत्य करून परत निघून जातात, असे यापूर्वी अनेकदा उघडकीस आलेले आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि दसरा, दिवाळी सणातही असे कृत्य घडण्याची शक्यता औरंगाबादेत नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या घर, हॉटेल, लॉजमध्ये वास्तव्यासाठी येणाऱ्या भाडेकरूचे नाव, मूळ पत्ता, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक घ्यावा, त्यानंतरच त्याला वास्तव्य करू द्यावे. शिवाय या भाडेकरूची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ कळवावी; अन्यथा संबंधित मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी दिला आहे.