पाचही आगारांचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात !

By Admin | Updated: March 16, 2015 00:50 IST2015-03-16T00:42:41+5:302015-03-16T00:50:53+5:30

लातूर : एस.टी. महामंडळाच्या परिवहन मंत्र्याच्या आदेशानुसार राज्यातील सर्व विभागीय कार्यालयाबरोबरच लातूरच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छता

The report of the five pillars is still in the bouquet! | पाचही आगारांचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात !

पाचही आगारांचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात !


लातूर : एस.टी. महामंडळाच्या परिवहन मंत्र्याच्या आदेशानुसार राज्यातील सर्व विभागीय कार्यालयाबरोबरच लातूरच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविली़ हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडे अहवाल पाठविणे आवश्यक होते़ तरीही पाचही आगाराचे स्वच्छता मोहिमेच्या कामाचे अहवाल विभागीय कार्यालयात पडूनच आहेत़
संपूर्ण स्वच्छता अभियान मोहिमेअंतर्गत लातूर एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा, लातूर या पाच आगारात स्वच्छता मोहीम यशस्वी राबविली़ तसेच विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्रमांक २ या बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली़ या स्वच्छतेचे फोटो व व्हिडीओ शुटींगही करण्यात आली़ या केलेल्या कामाची पाहणी विभागीय कार्यालयाअंतर्गत येणारे पालक अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, विभागीय अभियंता व अन्य एक अशा पाच कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली़ या केलेल्या कामाचे अहवाल विभागीय कार्यालयाकडे आले आहे़ या कामाचा अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे सात दिवसांत पाठविणे आवश्यक होते तरीही ते संपूर्ण स्वच्छता अभियान मोहिमेचे अहवाल मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्याचे सौजन्य लातूर विभागीय कार्यालयाने दाखविले नाही़ त्यामुळे एस.टी. महामंडळाची स्वच्छता मोहीम नावालाच की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: The report of the five pillars is still in the bouquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.