शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी घटनेचे पडसाद; पाचोडजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:42 IST

रास्तारोको आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्हीही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती. 

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड: परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाचोड जवळ धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी  दिलेल्या विविध घोषणामुळे राष्ट्रीय महामार्ग दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी परभणी येथील प्रकरणात आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत,  अटकेतील सर्व आंदोलकांची तत्काळ सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या परभणी पोलिसांवर कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशा मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पैठण तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयकुमार केकान, तलाठी अनुना कावळे, पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांना दिले.  तब्बल वीस मिनिटे चाललेल्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्हीही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती. 

आंदोलनात अविनाश मिसाळ, राजू खरात, वैजनाथ घनघाव, उद्धव मगरे, विशाल मगरे, कृष्णा वाव्हळ, आकाश मगरे,  सिद्धार्थ मगरे, देविदास मगरे आदी आंबेडकरवादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चिमूकल्या आंदोलकांनी प्रबोधनात्मक भाषण करून लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरagitationआंदोलनhighwayमहामार्ग